Gold Rate Today : आंतरराष्ट्रीय बाजारात फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीच्या निर्णयांनतर जागतिक बाजारपेठेसह भारतीय बाजारात सोन्या-चांदीचे दर (Gold-Silver Rate) काही अंशी वाढले आहेत. आज सोन्याचे दर 600 रूपयांनी तर, चांदीचे दर तब्बल एक हजार रूपयांनी वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांसाठी आज सोने खरेदीचा दिवस चांगला नाही असेच दिसून येते. सोन्याचे हे वाढलेले दर मुंबईसह, पुणे, नाशिक, कोलकत्ता मध्येही याच दराने व्यवहार करत आहेत. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,850 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 69,030 रुपये आहे.   

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  50,279 69,030
पुणे 50,279 69,030
नाशिक  50,279 69,030
नागपूर 50,279 69,030
दिल्ली 50,078 68,790
कोलकाता  50,096 68,820

जागतिक बाजारपेठेतील दर : 

स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.3% वाढून $1,796.50 वर होते. स्पॉट सिल्व्हर 0.6% वाढून $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% वाढून $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% वाढून $1,889.50 वर पोहोचले.

 सोनं खरेदी करण्यापूर्वी 'अशी' तपासा सोन्याची शुद्धता (Check Gold Purity) :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

महत्त्वाच्या बातम्या : 

Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारात खरेदीचा जोर, बँक निफ्टीने ओलांडला 44000 अंकांचा टप्पा