Drug Case Investigation प्रकरणी अर्जुन रामपालच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत. आधी अर्जुन, पुढं त्याची प्रेयसी, तिचा भाऊ आणि आता अर्जुनच्या बहिणीलाही एनसीबीनं रडारवर घेतलं आहे. कोमल रामपाल या अर्जुनच्या बहिणीला एनसीबी अर्थात Narcotics Control Bureau (NCB) नं समन्स बजावलं आहे.
समन्स बजावत अर्जुनच्या बहिणीला बुधवारी चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अर्जुन आणि त्याची पार्टनर गॅब्रिएला यांची एनसीबीकडून चौकशी करण्यात आल्यानंतर कोमल रामपाल हिला समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, मागील दोन आठवड्यांमध्ये अर्जुन रामपालच्या घरावर धाड टाकली असला त्या कारवाईमध्ये एनसीबीला काही प्रतिबंधित औषधं हाती लागली होती. यापैकीच काही औषधं आपल्या बहिणीची असल्याचं त्यांनं सांगितल्याची माहिती समोर आली. किंबहुना बहिणीच्या नावे औषधांची एक चिठ्ठी एनसीबीकडे देण्यात आली होती, ती खोटी असल्याचं आढळून आलं. याच प्रकरणात एनसीबीनं चौकशीसाठी अर्जुनच्या बहिणीला समन्स बजावल्याचं कळत आहे.
सुरुवातीपासून काय घडलं त्यावर एक नजर....
अर्जुनचं यावर म्हणणं काय...
एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, "अर्जुन रामपालने सांगितलं की त्याच्या घरात ज्या दोन प्रकारच्या गोळ्या सापडल्या आहेत, त्यापैकी एक गोळी कुत्र्यासाठीची असून जी वेटनरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली होती. तर दुसरी गोळी बहिणीची आहे. दिल्लीतील एका मानसोपचारतज्ज्ञांनी तिच्या एन्झायटीबाबत ही गोळी दिली होती." "ज्या संशयाच्या आधारे मला चौकशीसाठी बोलवलं होतं तो संशयच बिनबुडाचा आहे," असंही अर्जुन रामपालने आपल्या जबाबात म्हटलं होतं.
एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन रामपालच्या प्रेयसीचा भाऊ अॅगिसियालोस डेमीट्रिएड्सला अटक केल्यानंतर एनसीबीने जेव्हा त्याचा मोबाईल तपासला असता त्याचे अर्जुन नावाच्या व्यक्तीसोबतचे काही चॅट्स सापडले होते. त्या चॅटमध्ये ड्रग्जचा उल्लेख होता. मग 9 नोव्हेंबरला एनसीबीच्या पथकाने अर्जुन रामपालच्या वांद्र्यातील कॅप्री हाईट्स इथल्या घरात छापा मारला होता.