मुंबई : अर्जुन रामपाल प्रेयसी गैब्रिएला डेमेट्रिएड्स भावाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास केला जात असतानाच अगिसियालोस डेमेट्रिएड्स या विदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. अगिसियालोस डेमेट्रिएड्सची अटक खूप महत्वाची असल्याच सांगितलं जातं कारण तो बॉलीवूडमध्ये बड्या कलाकारांना ड्रग्ज पुरवत असे. एनसीबी त्याच्या मदतीने बॉलीवूडच्या मोठ्या कलाकारांपर्यंत पोहचण्याच्या प्रयत्नात आहे.


मॉडेल, अभिनेता आणि टेक्सटाईल बिजनेसमॅन अगिसियालोस डेमेट्रिएड्स रिया ड्रग्ज प्रकरणातील 23 वा अटक आरोपी आहे. अगिसियालोस हा स्वता: ड्रग्ज घ्यायचा आणि बॉलीवुड, मॉडेलिंग जगतातील मोठ्या नावांपर्यंत ड्रग्ज पोहचवण्याचे काम करायचा, असे आरोप करण्यात आले आहे. अगिसियालोस जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा त्याच्या कडून 0.8 ग्राम चरस एनसीबीला सापडलं. तर त्याच्या मुंबईच्या घरातून Alprazolam गोळी सुद्धा सापडली असून ज्याला भारतात बंदी आहे.


एनसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला ड्रग्स पेडलर अनुज केशवानी आणि केजे कडून अगिसियालोसचं नाव समोर आलं आहे. आतापर्यंतची अतिशय महत्वाची अटक मानली जात आहे. कारण अगिसियालोस बॉलिवुडमधील डायरेक्टर, मॉडेल्स यांच्या संपर्कात होता आणि त्यांना ड्रग्ज पुरवत होता. एनसीबीला अगिसियालोस मिळालेल्या माहितीच्या आधारे बॉलीवुड आणि मॉडेलिंग जागातल्या लोकांची एक लिस्ट तयार करत आहे. म्हणजे येणाऱ्या दिवसांत अजून मोठी नावं समोर येण्याची दाट शक्यता असून एनसीबी या सर्वांना चौकशीसाठी समन बजावण्याच्या तयारीत आहे.


अगिसियालोस नाव समोर आल्यानंतर अर्जुन रामपालच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण अर्जुन रामपाल हा एनसीबीच्या रडारवर होताचं. अर्जुन स्वत: ड्रग्ज घेतो आणि बॉलीवुडमध्ये ड्रग्ज पुरवण्याचे काम करत असल्याचा आरोप आहे. तसेच अगिसियालोस आणि अर्जुनचे संबंध बॉलीवुडच्या त्या अभिनेत्यांसोबत आहेत ज्यांचे राजकारण्यांशी थेट संबंध आहे. म्हणून अगिसियालोसच्या अटकेनंतर काही राजकारण्यांची ही अडचण वाढू शकते.


कोण आहे अगिसियालोस डेमेट्रिएड्स?




  • अर्जुन रामपाल प्रियसी गैब्रिएला डेमेट्रिएड्स भाऊ आहे अगिसियालोस डेमेट्रिएड्स

  • अगिसियालोस डेमेट्रिएड्स मूळचा साऊथ आफ्रिकेच्या नागरिक आहे.

  • अर्जुन रामपाल मुळे बॉलीवूडमध्ये अगिसियालोसची चांगली ओळख आहे.

  • अगिसियालोस बॉलीवूडमध्ये काही डायरेक्टर्स, मॉडेल्स आणि अॅक्टर्सला ड्रग्स पुरवत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली.

  • अगिसियालोस ज्या ड्रग्स पेडलर च्या संपर्कात होता ते ड्रग्स पेडलर शौविकच्या देखील संपर्कात होते.

  • अगिसियालोसचा संपर्क साऊथ आफ्रिकेच्या ड्रग्स सिंडीकेटशी सुद्धा असल्याची माहिती मिळत आहे.


संबंधित बातम्या :