Arijit Singh : माहिरा खान (Mahira Khan) पाकिस्तानी अभिनेत्री असली तरीही, तिचे जगभरात चाहते आहेत. नुकतीच ती तिच्या लग्नामुळे चर्चेत होती आणि आता एका कॉन्सर्टमुळे ती चर्चेत आली आहे. माहिरा खान दुबईत अरजित सिंहच्या (Arijit Singh) म्युझिकल कॉन्सर्टला गेली होती. याच कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'रईस' फेम अभिनेत्री माहिरा खान या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचेवळी तिच्या चित्रपटातील जालिमा हे गाणं अरजित सिंह गात आहे. 


खरंतर व्हायरल व्हिडिओमध्ये अरजित सिंह माहिरा खानची प्रेक्षकांना ओळख करुन देत असल्याचं पाहायला मिळतंय. तेव्हा तो प्रेक्षकांना म्हणते, मी एक खुलासा करु का? कदाचित मला हे अतिशय चांगल्या पद्धतीने करायला हवं. तेव्हा तो माहिराकडे बोट दाखवून म्हणतो की, आपण तिथे एक कॅमेरा लावू शकतो का? बऱ्याच वेळापासून मी त्या व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, मी ह्या व्यक्तीसाठी गाणं गायलं आहे. 


अरजित सिंहने पाकिस्तानी अभिनेत्रीची मागितली माफी


अरिजित सिंग पुढे म्हणाला, देवियो और सज्जनो माझ्यासमोर माहिरा खान बसली आहे. मी तिचं जालिमा हे गाणं गात होतो आणि ती पण ते गाणं गात होती. ती माझ्या समोर उभी होती पण मला तिला ओळखता नाही आलं. मला प्लीज माफ करा. मी आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल. अरजितचा हा व्हिडिओ पाहून चाहते देखील आश्चर्यचकित झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


माहिरा खानची प्रतिक्रिया


जेव्हा माहिरा खानची ओळख झाली आणि तिचा चेहरा मोठ्या पडद्यावर दाखवला गेला, तेव्हा तिने प्रथम प्रेक्षकांना हाय केलं. त्यानंतर मात्र संपूर्ण कार्यक्रमातील लाईट हे तिच्यावर होते आणि फोकसही तिच्यावर होता.  अभिनेत्रीने सलीम करीमसोबत दुसरे लग्न केले. तिच्या लग्नाचा व्हिडिओ देखील समोर आला होता. तिला एक मुलगी असून ती देखील तिच्यासोबत राहते.        






ही बातमी वाचा : 


TMKOC : 'तारक मेहता' फेम अभिनेता गुरुचरण सिंह करणार होता लग्न, बेपत्ता होण्यापूर्वी एटीएममधून काढले होते 7 हजार रुपये