Taarak Mehta ka Ooltah Chashma : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta ka Ooltah Chashma) या कार्यक्रमात रोशन सिंग सोढी हे पात्र अभिनेता गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) याने साकारली होती. पण सध्या त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देणारी बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. गुरुचरण सिंग बेपत्ता असून दिल्ली पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असल्याचं सागंण्यात आलं. आता तो बेपत्ता होऊन तब्बल सहा दिवस उलटले आहेत.


त्याचे वडील हरगीत सिंग यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा देखील दाखल केला होता. गुरुचरणचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.दरम्यान, त्याचे शेवटचे ठिकाण आणि एटीएममधून काही पैसे काढल्याची माहिती आलीये. त्याचप्रमाणे तो त्याच्या लग्नाच्या तयारी करत असल्याचंही म्हटलं जातंय. 


अभिनेता गुरचरण सिंग बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. तसेच तो 22 एप्रिल रोजी मुंबईवरुन दिल्लीसाठी फ्लाईट पकडणार होता. पण त्यावेळी तो विमानतळाच्या दिशेने गेला नसल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये, अभिनेता दिल्लीतील पालमसह इतर अनेक भागात पाठीवर बॅग घेऊन फिरताना दिसत आहे.


एटीएममधून काढले 7 हजार रुपये


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 24 एप्रिल रोजी गुरुचरणने त्याच्या घरापासून  अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पालम, दिल्ली येथील एटीएममधूनही सुमारे 7 हजार रुपये काढले होते. त्यानंतरच त्याचा फोन बंद झाला. म्हणजेच 24 एप्रिलपर्यंत अभिनेता हा दिल्लीतच होता आणि त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला.  म्हणजेच 24 तारखेलाच तो पालम येथील घरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी होता, हे यावरुन स्पष्ट झालंय. 


गुरुचरणचं शेवटचं लोकेशन


पोलिसांच्या तपासातून दोन गोष्टींचा खुलासा झाल आहे. एकीकडे गुरुचरण सिंग हा लग्नाच्या तयारीत होता, तर दुसरीकडे तो आर्थिक संकटातून जात असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या फ्लाइटची वेळ रात्री 8:30 होती पण फोनवरील शेवटचे लोकेशन रात्री 9:14 च्या सुमारास पालम हे होते.


शेवटची पोस्ट वडिलांसाठी...


गुरुचरण 'तारक मेहता...' मध्ये रोशन सिंह सोधी म्हणून प्रसिद्ध झाला. त्याने 2013 मध्ये मालिका सोडली आणि एक वर्षानंतर परतला. 2020 मध्ये हा अभिनेता पुन्हा मालिकेमधून बाहेर पडला. तो इंस्टाग्रामवर खूप सक्रिय होता आणि त्याची शेवटची पोस्ट 22 एप्रिल रोजी त्याच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी होती. पोस्टमध्ये लिहिले होते, 'बाबा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


ही बातमी वाचा : 


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोढी बेपत्ता; मालिकेची टीम म्हणते...