April 2024 OTT Release : एप्रिल महिन्यात घरबसल्या प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. सध्या जिओ सिनेमावर आयपीएलची धूम पाहायला मिळतेय, तर दुसरीकडे अनेक सिनेमे ओटीटीसाठी (OTT) सज्ज झालेत. त्यामुळे एप्रिल महिना हा मनोरंजनाने फुल्ल असणार आहे. या महिन्यात प्राईम व्हिडिओसह डीज्नी प्लस हॉटस्टार पर्यंत 'अमर सिंह चमकीला' (Chamkila), 'ये मेरी फॅमिली', 'आर्टिकल 370' (Article), 'फ्रँकलिन' असे अनेक चित्रपट आणि वेब सिरिज या प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे घरसबल्या तुमची वॉच लिस्ट आता रेडी ठेवा.


या यादीमध्ये आर्टीकल 370, चमकीला, सायलेंट-2 या सिरिज आणि चित्रपटांचा समावेश आहे. आर्टीकल-370 ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार असल्याचं म्हटलं जात होतं. लोकसभा निवडणुकांच्या पहिल्याच टप्पा अन् आर्टीकल 370 च्या रिलीज तारीख एकच असण्याची शक्यता आहे. येत्या 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा आहे. त्याच दिवशी आर्टिकल 370 ओटीटीवर येऊ शकते. 


ये मेरी फॅमिली


जुही परमार आणि राजेश कुमार यांच्या ये मेरी फॅमिली या सिरिजचा तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 4 एप्रिल रोजी अॅमेझॉन मिनी टीव्हीवर प्रदर्शित केली जाणार आहे. या सिरिजमध्ये जुही परमारने नीरजाचं पात्र साकारालं आहे. तसेच या सिरिजमध्ये अंगद राज आणि हेत गाडा देखील आहेत. 


फर्रे


सलमान खानचा भाचा अलिजेह खान याचा फर्रे हा सिनेमा देखील ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटातून अलिजेह खान हा सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. मागील वर्षी थिएटरमध्ये रिलीज झालेला हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 5 एप्रिलला हा चित्रपट झी5 वर रिलीज होणार आहे. 


सायलेंट -2


मनोज  वाजपेयीची 2021 मध्ये सायलेंट : कॅन यू हिअर इट? ही सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता 3 वर्षांनी या सिरिजचा सीक्वल येत आहे. 10 एप्रिल रोजी ही सिरिज झी5 वर प्रदर्शित केली जाणार आहे. 


अदृश्यम


मालिकाविश्व गाजवल्यानंतर दिव्यांका त्रिपाठीने आता ओटीटीवर पाऊल ठेवलं आहे. आता तिची अदृश्यम ही वेब सिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 11 एप्रिल रोजी ही सिरिज सोनी लिव्हवर प्रदर्शित होईल. 


अमर सिंह चमकीला


दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्राची अमर सिंह चमकीला या सिनेमाची बऱ्याच काळापासून चर्चा होती. हा सिनेमा आयकॉनिक पंजाबी सिंगर अमर सिंह चमकीलाच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट 12 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 


ही बातमी वाचा : 


April 2024 movie Released : लोकसभेच्या इलेक्शनमध्ये हे सिनेमे करणार कलेक्शन; एप्रिल महिन्यात बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची रेलचेल