Anusha Dandekar Talks Indirect Dig At Ex-bf Karan Kundrra: अनुषा दांडेकरनं (Anusha Dandekar) करण कुंद्रासोबतच्या (Karan Kundrra) तिच्या भूतकाळाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्री आणि व्हीजेचा दावा आहे की, तिनं एकदा करणसाठी डेटिंग अॅपद्वारे कॅम्पेल केलेलं, पण नंतर तिला कळलं की, करण इतर महिलांना भेटण्यासाठी त्याच प्लॅटफॉर्मचा वापर करत होता.

Continues below advertisement

अनुषा आणि करण कुंद्रा स्टार कपल्सपैकी एक होते. एकमेकांना डेट करण्यापूर्वी ते दोघेही गेली अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. एमटीव्हीवरचा प्रसिद्ध शो 'लव्ह स्कूल'मुळे दोघेही प्रसिद्धीझोतात आलेले. पण, काही दिवसांनी दोघांचा ब्रेकअप झाला. दोघांचा ब्रेकअप चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. पण, आता ब्रेकअपनंतर बऱ्याच दिवसांनी अनुषानं एक्स-बॉयफ्रेंड करण कुंद्राबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. अनुषानं केलेल्या धक्कादायक खुलाशानंतर चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

अनुषा दांडेकर नेमकं काय म्हणाली?

रेडिटवर व्हायरल झालेल्या एका मुलाखतीत तिनं खुलासा केला की, ती रिलेशनशिपमध्ये असताना, तिनं तिच्या प्रियकराला बंबल नावाच्या डेटिंग अॅपद्वारे कॅम्पेन सुरू करण्यास मदत केली होती, पण नंतर तिच्या लक्षात आलं की, तो इतर महिलांशी संपर्क साधण्यासाठी त्याच अॅपचा वापर करत होता. हे ऐकल्यावर तिला धक्का बसला. दरम्यान, अनुषा दांडेकरची मुलाखत आता डिलीट करण्यात आली आहे.

Continues below advertisement

करण कुंद्राचं नाव न घेताच अनुषा दांडेकरचा खुलासा 

करण कुंद्राचं नाव न घेताच अनुषा म्हणाली की, "डेटिंग अॅप्सबाबत मला फारच विचित्र अनुभव आलाय. मला एका डेटिंग अॅपसाठी कॅम्पेन करण्यासाठी साईन करण्यात आलेलं आणि त्यावेळी माझ्या बॉयफ्रेंडनंही त्याच अॅपच्या कॅम्पेनसाठी कॉन्ट्रॅक्ट साइन केलेलं आणि आम्ही दोघंही एकत्र ते कॅम्पेन करणार होतो."

अनुषानं सांगितलं की, ते कॅम्पेन करत असतानाच मला समजलं की, करणनं अनेकदा तिला फसवलंय. त्यावेळी अनुषाला तिच्यासोबत फसवणूक झाल्याचं कळालं. त्याचवेळी बोलताना तिच्या एक्स-बॉयफ्रेंडवर पूर्ण मुंबईसोबत रात्री घालवल्याचा आरोपही केला. ती पुढे म्हणाली की,  "तो त्या अॅपचा वापर मुलींना भेटायला, त्यांच्यासोबत वेळ घालवायला करत होता. ज्याबाबत मला खूप वेळानं कळालं की, तो अख्ख्या मुंबईसोबत रात्र घालवत होता..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Deepika Padukone And Farah Khan Unfollowed Each Other: जिनं इंडस्ट्रीत संधी दिली, तिलाच अनफॉलो का केलं? फराह खान, दीपिका पादुकोणच्या मैत्रीत मिठाचा खडा?