Deepika Padukone And Farah Khan Unfollowed Each Other: दीपिका पदुकोणनं (Deepika Padukone) गेल्या बऱ्याच दिवसापासून तिनं केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. दीपिकानं तिची मुलगी दुआ झाल्यानंतर 8 तासांच्या शिफ्टची मागणी केली आणि अख्ख्या इंडस्ट्रीत खळबळ माजली. दीपिकाच्या मागणीमुळे फिल्म इंडस्ट्रीत एका नव्या वादाला तोंड फुटलं. अनेक निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी दीपिकाला खरं-खोटं सुनावलं. तर, अनेकांनी इंडस्ट्रीतलं वास्तव सांगत दीपिका मागणी योग्य असल्याचं सांगितलं. पण, दीपिकानं केलेली ही मागणी आता फराह खान आणि तिच्या मैत्रीत मिठाचा खडा बनलीय की, काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याला कारण आहे, दीपिका पादुकोन आणि फराह खाननं एकमेकांना इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो केलं आहे.
फराह खान (Farah Khan) सध्या व्ही व्लॉग करतेय. तिच्या एका व्लॉगमध्ये फराह खान दीपिकाच्या 8 तासांच्या शिफ्टच्या मागणीवर टीका करताना दिसली. त्यानंतर अचानक दोघींनीही एकमेकींना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं. यावरुनच आता असा अंदाज बांधला जात आहे की, दोघींमध्ये सर्वकाही ठीक नसून काहीतरी बिनसलं आहे.
घडलंय नेमकं काय?
खरं तर, अलिकडेच फराह खान तिचा स्वयंपाकी दिलीपसोबत अभिनेता रोहित सराफच्या घरी गेली होती, जिथे संभाषणादरम्यान दीपिका पदुकोणचा उल्लेख करण्यात आला होता. फराहच्या स्वयंपाकी दिलीपनं विचारलं की, दीपिका तिच्या व्लॉगवर कधी दिसणार? फराहनं लगेच उत्तर दिलं की, "आता दीपिका फक्त आठ तासांसाठी शूटिंग करते, तिच्याकडे व्लॉगवर दिसण्यासाठी वेळ नाही..." फराहनं केलेल्या कमेंटवर नेटकऱ्यांनी अक्षरशः उड्या घेतल्या.
फराह आणि दीपिकानं इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं?
असं म्हटलं जातंय की, फराह खान आणि दीपिका दीपिका पदुकोणच्या मैत्रीत तणाव निर्माण झाला आहे. खरंच, फराह आणि दीपिका आता एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करत नाहीत. त्यांनी कधी आणि का एकमेकांना अनफॉलो केलं, हे माहित नसलं तरी, नेटकरी असाच अंदाज लावत आहेत की, त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे. दीपिका इंस्टाग्रामवर फराह खानला फॉलो करत नाही आणि फराह दीपिका आणि रणवीरला फॉलो करत नाही. जिनं दीपिकाला इंडस्ट्रीत संधी दिली, तिलाच दीपिकानं अनफॉलो का केलं? याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
दीपिकाला फराह खाननंच केलेलं लॉन्च
दीपिका पदुकोणनं फराह खानच्या 'ओम शांति ओम' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला. या सिनेमात दीपिकानं शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर केलेली. त्यानंतर दीपिकानं 'हॅपी न्यूईयर' सिनेमात फराह खानसोबत काम केलं. दोघींमध्ये कित्येक वर्षांपासून घट्ट मैत्री आहे. पण, आता अचानक दोघींनी एकमेकींना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
दीपिकाची आठ तासांच्या शिफ्टची मागणी नेमकी काय?
काही महिन्यांपूर्वी दीपिका पदुकोण चर्चेत आली होती, जेव्हा तिच्या जागी 'स्पिरिट'मध्ये संदीप रेड्डी वांगा आणि नंतर तृप्ती डिमरीला घेण्यात आलं. त्यानंतर, प्रभास अभिनीत 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी घोषणा केली की, दीपिका पदुकोण आता चित्रपटात दिसणार नाही. याचं कारण अभिनेत्रीनं 8 तासांच्या शिफ्टची मागणी केल्याचं सांगितलं जातंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :