Ankita Walawalkar Gifts For Dhananjay Powar: बिग बॉस मराठीचं (Big Boss Marathi) पाचवं पर्व धम्माल उडवून देणारं होतं. बिग बॉसच्या घरात अनेक नवी नाती तयार होतात, मैत्री होते. असंच पाचव्या पर्वातलं नातं म्हणजे, डीपीदादा (Dhananjay Powar) आणि कोकण हार्टेड गर्ल (Kokan Hearted Girl) अंकिता वालावलकरचं (Ankita Walawalkar). दोघांमधील मैत्रीचं, भावा-बहिणीच्या नात्याची प्रचिती आपण बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर घेतली आहेच. बिग बॉसच्या खेळात जेव्हा-जेव्हा गरज असेल, तेव्हा-तेव्हा दोघेही एकमेकांसाठी उभे राहिलेले दिसले. तसेच, घरातून बाहेर पडल्यानंतरही दोघे एकमेकांच्या अडीनडीच्या काळात एकमेकांसाठी धावून गेले. अशातच आता, रक्षाबंधनाच्या सणानिमित्त अंकिताना आपल्या लाडक्या डीपीदादासाठी राखी पाठवली आहे. तसेच, पत्रही लिहिलं आहे.
सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच, अंकिता वालावलकरनं रक्षाबंधनानिमित्त धनंजय पोवार म्हणजेच, डीपीदादाला राखी पाठवली आहे. त्यासोबतच एक पत्रही लिहिलं असून धनंजय पोवारसाठी भेटवस्तूही पाठवली आहे. गेल्यावर्षी बिग बॉसच्या घरात असतानाही अंकिताने डीपीला राखी बांधली होती. पण, यंदा ती कामानिमित्त बाहेरगावी गेली असल्यानं अंकितानं राखी आणि भेटवस्तू डीपीदादाकडे पाठवून दिली आहे. धनंजय पोवारनं त्याच्या युट्यूब चॅनेलवर यासंदर्भातला सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे
अंकितानं पत्रात काय म्हटलंय?
अंकितानं डीपीदादासाठी लिहिलेल्या पत्रात लिहिलंय की, "प्रिय डीपी दादा गेल्यावर्षी बिग बॉसच्या घरामध्ये मी तुम्हाला राखी बांधली होती. ते दिवस आठवले तरी अंगावर काटा येतो. काय करावं काहीच कळत नव्हतं. तेव्हा आपणच एकमेकांचा आधार बनलो. यावर्षी तुमची बहिण काही पूर्वनियोजित कामांमुळे भारतात नाही. पण, आपलं नातं साजरं झालं पाहिजे. राखी आणि डीपी स्टाईल काही शर्ट तुम्हाला पाठवतेय... आवडलं तर रक्षाबंधनाच्या दिवशी नक्की घाला... राखी ताईकडून बांधून घ्या..."
""मला काही गिफ्ट नको, पण खरी गरज असेल तर तेव्हा पाठिशी उभे राहा मला गेल्यावर्षी तुम्ही जो आधार दिला तो मी कधीच विसरणार नाही. अगदी अबोला धरला तरीही नाही. आणि तुम्हाला माहितीची आहे मी जास्त रागावत नाही. आपला भाऊ चुकू नये यासाठी मी बऱ्याचदा तुम्हाला ऐकवते. पण, त्यामागे एकच उद्देश असतो की तुम्ही कमी चुका कराव्यात. त्यासाठी मला तुमच्या बाबांसोबत चर्चेला बसावं लागेल. खूप मोठे व्हा... रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा... तुमचं वादळ."
अंकिताचं पत्र वाचल्यानंतर डीपीदादा काय म्हणाला?
त्यानंतर डीपी त्याच्या भावना व्यक्त करताना म्हणाला की, "खूप खूप धन्यवाद तुला, मी तुला गिफ्ट देणारच होतो पण, योगायोगाने तू पूर्वनियोजित कामांमुळे भारतात नाहीस. पण, तू जेव्हा भारतात परत येशील तेव्हा तुझ्या आवडीचा ड्रेस, साडी किंवा तुझ्या आवडीचा एखादा गॉगल देण्याचा प्रयत्न करु. खूप खूप प्रेम!"
पाहा व्हिडीओ:
महत्त्वाच्या इतर बातम्या :