John Abraham Donald Trump Tariffs India: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ (25 Percent Additional Tariff On India) लादलं आहे. अमेरिकेनं (America) आता भारतावर (India) लादलेलं टॅरिफ आता 50 टक्क्यांवर पोहोचलं आहे. रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवल्यानं भारतावर ही कारवाई केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प सरकारकडून (Trump Government) घेण्यात आलेल्या निर्णयावर सर्वच स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमनं (Bollywood Actor John Abraham) अमेरिकेनं लादलेल्या टेरिफवर चिंता व्यक्त करत टीकाही केली आहे. 

जॉन अब्राहम काय म्हणाला? 

'द इंडियन एक्सप्रेस'च्या आयडिया एक्सचेंज शोमध्ये जॉन अब्राहमनं अमेरिका-भारत संबंधांबद्दल आपलं मत व्यक्त केलं. तसेच, त्यानं भारतावर लावलेल्या 50 टक्क्यांच्या कर धोरणावर वेगळ्या शैलीत टीकाही केली आहे. जॉन बोलताना म्हणाला की, ""अमेरिकेचा शत्रू असणं धोकादायक, पण मित्र असणं अजूनच घातक आहे. ते कोणत्या बाजूने जातील, याचा अंदाज नाही..."

पुढे बोलताना जॉननं त्याच्या सिनेमाचा हटके किस्साही सांगितला. तो म्हणाला की, "चित्रपटातील एक रोचक गोष्ट अशी होती की, इस्रायली कलाकारांनी इस्रायली पात्रं साकारली आणि इराणी कलाकारांनी इराणी पात्रं साकारली. पण आम्ही एकत्र बसून जेवलो आणि सगळं काही सुरळीत होतं. कोणतीही अडचण नव्हती. अशा गोष्टी पाहून वाटतं की जगात नक्की काय चाललंय आणि आपले मित्र सतत नियम बदलत असतात..."

ट्रम्प यांनी लागू केलेलं अतिरिक्त टेरिफ कधीपासून लागू होणार? 

भारत रशियन फेडरेशन ऑईलची आयात करत असल्यानं अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लादत आहोत, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी हा आदेश लागू केल्यापासून 21 दिवसांनी लागू होणार आहे. म्हणजेच हा आदेश 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेला आदेश 21 दिवसांमध्ये लागू केला जाईल. म्हणजेच 27 ऑगस्ट  2025 पासून अमेरिकेला ज्या वस्तूंची निर्यात केली जाईल त्यावर लागू असेल. 27 ऑगस्टपूर्वी ज्या वस्तूंची अमेरिकेला निर्यात झाली असेल आणि ज्या वस्तू 17 सप्टेंबरपूर्वी अमेरिकेत पोहोचतील त्यांना या शुल्कातून सूट देण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं स्पष्टपणे संकेत दिले आहेत की रशियाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तेल आयात करतील त्यांच्यावर या प्रकारची कारवाई केली जाईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Amitabh Bachchan Love Story: जया, रेखा साऱ्या नंतर, बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी बिग बींचं 'या' तरुणीसोबत जुळलेलं सूत, लग्नाच्या आणाभाका घेऊनही अधुरीच राहिली लव्हस्टोरी...