Weather Update: राज्यात मान्सूनच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढलाय. काल (8ऑगस्ट ) मुंबई,नवी मुंबईसह पुणे मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी लागली . काल राज्यभर पावसाचा यलो अलर्ट होता . आजही विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत . 

Continues below advertisement


हवामान विभागाच्या अंदाजानुसार,बंगालच्या उपसागरात 13 ऑगस्ट पासून कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे .  उद्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे .. दरम्यान, आज विदर्भ मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट आहेत. 


कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट? 


रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नगर, परभणी, नांदेड ,हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा ,नागपूर, भंडारा, गोंदिया ,चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे .


मुंबईसह मुंबई उपनगर ठाणे रायगड पालघर  नाशिक छत्रपती संभाजी नगर जालना, धुळे जळगाव या जिल्ह्यांमध्ये अलर्ट नसला तरी हलक्या पावसाची शक्यता आहे .उद्यापासून पावसाचा जोर काहीसा ओसरणार असून विदर्भात काही जिल्ह्यांना यलो अलर्ट आहेत .त्यानंतर दोन दिवसांनी मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे . 


मराठवाड्यात  पावसाचा अंदाज 


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन ते चार तासात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, बीड व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर काही ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे.


दिनांक 09 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली जिल्हयात तर दिनांक 11 ऑगस्ट रोजी लातूर, धाराशिव, बीड जिल्हयात तर दिनांक 12 ऑगस्ट रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.


मराठवाडयात दिनांक 08 व 09 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.


हेही वाचा 


टोमॅटोचे दर 85 रुपयांवर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारचा प्लॅन, कमी दरात मिळणार टोमॅटो