Bigg Boss 17 Ankita Lokhande : 'बिग बॉस 17'चा खिताब जिंकल्यानंतर सर्वत्र कॉमेडियन मुन्नवर फारुकीच्या (Munawar Faruqui) चर्चा आहेत. मुन्नवरने सर्वाधिक वोट मिळवत 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. त्याच्या या यशानंतर चाहतेच नाहीत तर अनेक दिग्गज अभिनेते देखील त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. मात्र, अभिनेत्री अंकिता लोखंडेचे (Ankita Lokhande) चाहते कालच्या ग्रँड फिनाले नंतर चांगलेच नाराज झाले आहेत. दरम्यान, अंकिता लोखंडेलाही (Ankita Lokhande) पराभवाने चांगलाच धक्का बसला आहे. मुन्नवर फारुकीने (Munawar Faruqui) बिग बॉसचा खिताब जिंकल्यानंतर तिचा चेहरा पडलेला दिसतोय. 


अंकिता लोखंडे टॉप 4 च्या राऊंडमधूनच पडली होती बाहेर (Ankita Lokhande)


बिग बॉसच्या 17 व्या सिझनमधील टॉप 4 च्या राऊंडमध्ये असतानाच अंकिता लोखंडे बाहेर पडली होती. ती बाहेर पडल्यानंतर खुद्द सलमान खान देखील हैराण झाला होता. शिवाय, अंकिताच्या चाहत्यांना आणि कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला होता. कारण शो सुरु झाला तेव्हापासून अंकिता चांगल्या पद्धतीने खेळली होती. अंकिताच बिग बॉस 17 ची विजेता ठरेल, असे बोलले जात होते. मात्र, इतर तिघांनाही तिला मात दिली आणि शेवटी मुन्नवर विजेता ठरला. 


अंकिताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 


अभिनेत्री अंकिता लोखंडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ महाअंतिम सोहळ्यानंतरचा आहे. या व्हिडीओला 'व्हायरल भयाणी' या पेजने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता लोखंडेचा चेहरा चांगलाच पडलेला दिसतोय. कॅमऱ्यसमोर आल्यानंतरही अंकिताने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ती प्रतिक्रिया न देता व्हॅनकडे जाताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरिल हावभाव तिची भावना व्यक्त करत आहेत. 


नेटकऱ्यांनीही व्यक्त केली भावना (Ankita Lokhande)


अंकिताच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले की, "मुन्नवरच्या विजयापेक्षा अंकिताच्या पराभवामुळे जास्त आनंद झालाय." तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, 'अतिआत्मविश्वासामुळेच पराभव झालाय'. अंकिता लोखंडे सहानुभूतीच्या जोरावर बिग बॉसची विजेता बनू इच्छित होती, अशी प्रतिक्रियाही काही चाहते व्यक्त करताना दिसत आहेत. बिग बॉस 17 चा खिताब मुन्नवर फारुकीने नावावर केल्यानंतर त्याला 50 लाख रुपये आणि चकाकती कार देण्यात आली आहे. सलमान खानच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला आहे. 


Credit - viralbhayani






 


इतर महत्वाच्या बातम्या 


Bigg Boss Kannada 10: 'बिग बॉस कन्नड-10'च्या ट्रॉफीवर कार्तिक महेशनं कोरलं नाव; इलेक्ट्रिक स्कूटर, कार अन् मिळाले 'इतके'लाख