Anjali Arora : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री अंजली अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगना रणौतचा रिअॅलिटी शो Lock Upp आणि व्हायरल हिट गाणं कच्चा बदाम यामुळे प्रसिद्ध झालेल्या अंजली अरोराचा नवा डान्स व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ थायलंडमधील एका नाईट क्लबमध्ये अंजली अरोरा डान्स करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, तिचा नाईट क्लबमधील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. त्यानंतर नेटकऱ्यांनी तिचं ट्रोलिंग देखील सुरु केलं आहे.
व्हिडिओमध्ये अंजली ओ साकी साकी या बॉलिवूड गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. शिमरी पेस्टल हॉल्टर-नेक क्रॉप टॉप आणि हाय-स्लिट स्कर्टमधील तिची स्टायलिश एन्ट्री आणि बॅकग्राऊंड परफॉर्मर्ससोबतची तिची एनर्जी यामुळे व्हिडिओ अधिकच चर्चेत आलाय. हा व्हिडिओ इंस्टाग्राम आणि X वर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सचं म्हणणं आहे की अंजली आता अभिनय किंवा इन्फ्लुएंसरची भूमिका सोडून विदेशातील हाय-एंड क्लब्समध्ये परफॉर्म करण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. मात्र अंजलीनं आतापर्यंत याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही—हा तिच्या करिअरचा नवा टप्पा आहे का? याबाबत चर्चा सुरु झालीये.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
सोशल मीडियावरील काही समीक्षकांनी तिच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, व्हायरल फेम फार काळ टिकत नाही आणि पैसे कमावण्यासाठी लोक अनेकदा वेगळ्या वाटा निवडतात. एका युजरनं लिहिलं, “व्हायरल फेम फक्त 1–2 वर्ष टिकतं. या काळात तुम्ही त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायला हवा, एखादा व्यवसाय सुरू करायला हवा किंवा सन्मानजनक करिअर शोधायला हवं. अन्यथा, पुढे आयुष्य जगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे दुबईची फ्लाइट आणि पटायामध्ये डान्स करणे.”
अंजलीचं डिजिटल करिअर आणि ट्रेंडिंग फॅक्टर
हा पहिलीच वेळ नाही जेव्हा अंजली अरोरा चर्चेत आली आहे. तिच्या स्टायलिश व्यक्तिमत्त्वामुळे, व्हायरल रील्समुळे आणि डिजिटल मीडियावरील व्हिडीओंमुळे ती सतत सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये राहिली आहे. सध्या पटाया नाइटक्लबमधील व्हायरल व्हिडिओमुळे तिच्या करिअरबाबत लोकांमध्ये अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे. ही तिच्या करिअरची नवी सुरुवात आहे की फक्त आणखी एक व्हायरल क्षण, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
सिटी ऑफ ड्रिम्सनंतर प्रिया बापटने पुन्हा एकदा दिला लेस्बियन किसिंग सीन, अंधेरा वेबसिरीज तुफान चर्चेत