Anirudh Ravichander Reacts On Wedding Rumours With Kavya Maran: प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनिरुद्ध रविचंदर (Famous Singer And Composer Anirudh Ravichander) आणि आयपीएलमधल्या हैदराबाद संघाची को-ओनर काव्या मारन (Sunrisers Hyderabad Co-Owner Kavya Maran) यांच्या लग्नाच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. आधी दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आणि त्यानंतर आता थेट दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला. याबाबत आता गायकानं मौन सोडलं आहे. यावर बोलताना त्यानं सर्वांना 'शांत राहा' असं आवाहन केलं आहे.
सोशल मीडियावर अचानक काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला. दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जाऊ लागलं आणि देशभरातील कित्येक तरुणांच्या काळजात चर्र झालं. पण, आता अनिरुद्धच्या प्रतिक्रियेमुळे मात्र, तरुणांच्या जीवात जीव आल्याचं पाहायला मिळतंय. अनिरुद्धनं काव्या आणि त्याच्या लग्नाच्या सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. असं काहीच नाहीये, शांत रहा असं म्हणत त्यानं चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
शनिवारी संध्याकाळी अनिरुद्धनं ट्विटरवर पोस्ट केली आणि लिहिलंय की, "लग्न आह? LOL, शांत रहा मित्रांनो, प्लीझ अफवा पसरवणं बंद करा..." दरम्यान, गायकानं लग्नाचं वृत्त फेटाळलं मात्र, त्यानं डेटिंगच्या अफवांवर कोणतीही कमेंट केलेली नाही. काहीजणांनी दावा केलाय की, नुकतेच काव्या आणि अनिरुद्ध डिनर डेटसाठी एकत्र दिसून आले होते."
अनिरुद्ध आणि काव्याच्या डेटिंगच्या चर्चा नेमक्या कशा सुरू झाल्या?
चर्चांना उधाण तेव्हा आलं, ज्यावेळी रेडिटर्सनी एक कहाणी सांगायला सुरुवात केली, ज्यामधली प्रमुख पात्र होती, अनिरुद्ध आणि काव्या. दोघांनीही एक वर्षापूर्वी डेटिंग सुरू केलेली आणि लग्नाच्या तयारीला सुरुवातही झाली आहे. रेडिटवर केलेल्या पोस्टनुसार, "असा अंदाज बांधला जात आहे की, संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन रिलेशनशिपमध्ये आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टार रजनीकांत यांनी स्वतः कलानिधी मारन यांच्याशी काव्या आणि अनिरुद्धच्या लग्नाबाबत बोलणी केली आहेत. त्यामुळे आता लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.
अनिरुद्ध रविचंदर कोण?
अनिरुद्ध रविचंदर हा अभिनेता रवी राघवेंद्र आणि शास्त्रीय नृत्यांगना लक्ष्मी यांचा मुलगा आणि चित्रपट निर्माते के सुब्रमण्यम यांचा नातू आहे. त्याची मावशी लता यांचं रजनीकांतशी लग्न झालं आहे. त्यांनी रजनीकांत, कमल हासन, विजय, अजित कुमार, सूर्या, पवन कल्याण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासह अनेक दक्षिणेकडील स्टार्ससाठी संगीत दिले आहे. शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातून त्याला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला.
काव्या मारनचं नेटवर्थ किती?
काव्या ही सन ग्रुपच्या अध्यक्षा कलानिधी मारन यांची मुलगी आहे आणि ती आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादची सह-मालक आहे. ती अनेकदा आयपीएल सामन्यांमध्ये तिच्या संघाला पाठिंबा देताना दिसते. काव्या मारनची एकूण एकूण संपत्ती अंदाजे मिलियन डॉलर म्हणजेच, सुमारे 409 कोटी रुपये आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :