Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Date Confirmed Rumours: आयपीएलचा (IPL 2026) सर्वाधिक चर्चेत असणारा संघ सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) ची सीईओ काव्या मारन (Kavya Maran) सध्या जोरदार चर्चेत आहे. तसं पाहायला गेलं तर, काव्या मारन नेहमीच चर्चेत असते. पण, यावेळी मात्र तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेल्या काव्या मारननं हॉर्ट ब्रेक केलाय. काव्या मारनचं लग्न ठरल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. इतकंच काय तर, काव्याच्या लग्नाची तारिखही कन्फर्म करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून काव्या मारन आणि बॉलिवूडचा प्रसिद्ध म्युझिक कंपोझर अनिरुद्ध रविचंदर (Music Composer Anirudh Ravichander) यांच्या रिलेशनशिपच्या (Kavya Maran Anirudh Ravichander) चर्चांना उधाण आलेल. अशातच आता दोघांच्या लग्नाची तारिखही कन्फर्म करण्यात आल्याचं बोललं जातंय.  

Continues below advertisement

मीडिया रिपोर्टनुसार, काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर (Anirudh Ravichander) एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असून आता दोघे लवकरच आपल्या नात्याला नाव देणार आहेत. दोघेही लग्नबंधनात अडकणार असून लग्नाची तारिखही कन्फर्म करण्यात आली आहे.  

कधी आणि केव्हा होणार लग्न? (Anirudh Ravichander Kavya Maran Wedding Rumours)

Continues below advertisement

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन याच वर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न करणार आहेत. 'लेट्स सिनेमा'नं दिलेल्या वृत्तानुसार, दोघेही 10 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकणाक आहेत. रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, दोघांचं लग्न ग्रीसमध्ये होणार आहे. हे लग्न एक शाही डेस्टिनेशन वेडिंग असेल, असंही बोललं जातंय. दरम्यान, काव्या आणि अनिरुद्धच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं असलं, तरीसुद्धा दोघांनीही यावर कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. 

मामाच्या वक्तव्यानं सुरू झालेल्या लग्नाच्या चर्चा (Kavya Maran Wedding Rumours)

अनिरुद्ध आणि काव्या यांच्यातील नात्याच्या चर्चा तेव्हा सुरू झाल्या, जेव्हा अनिरुद्धचे मामा आणि अभिनेते वाय. जी. महेंद्रन यांनी एका मुलाखतीत त्या दोघांबद्दल भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की, अनिरुद्ध लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तेव्हापासूनच, त्याच्या लग्नाच्या अफवा सोशल मीडियावर वेगानं पसरू लागल्या.

अनिरुद्ध, काव्या यांच्यातील रिलेशनशिपच्या चर्चा 

अनिरुद्ध आणि काव्या यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2025 मधील एका व्हायरल पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, दोघेही एका वर्षापेक्षा जास्त काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि लग्न करण्याच्या विचारात आहेत. पण, त्यावेळी अनिरुद्धनं या बातम्या केवळ अफवा असल्याचं सांगून फेटाळल्या होत्या. त्यानं सोशल मीडियावर लिहिलं होतं की, "लग्न? अरे बापरे, जरा शांत राहा आणि अफवा पसरवणं थांबवा..."

सनराइजर्स हैदराबादची CEO काव्या मारन (Sunrisers Hyderabad CEO Kavya Maran)

काव्या मारन आयपीएल टीम सनरायझर्स हैदराबादची सीईओ आहे. ती सन ग्रुपचे चेअरमन कलानिधी मारन यांची मुलगी आहे. काव्या मारनला नेहमीच आयपीएल सामन्यांदरम्यान आपल्या टीमला सपोर्ट करताना दिसलीय. याव्यतिरिक्त, ती तिच्या बिझनेस आयडिया आणि प्रोफेशनल दृष्टिकोनासाठी ओळखली जाते.

अनिरुद्ध रविचंदर कोण? (Who Is Anirudh Ravichander?)

अनिरुद्ध रविचंदर हे म्युझिक इंडस्ट्रीतलं एक मोठं नाव. अनेक सुपरहिट सिनेमांमधील आपल्या म्युझिकनं त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकलीत. त्याच्या दमदार म्युझिकमुळे सिनेमे तर खास बनतातच, याशिवाय त्यांची अनेक गाणी दीर्घकाळापर्यंत लोकांच्या प्लेलिस्टचा अविभाज्य भाग बनून राहतात. अनिरुद्धच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्यास, अनिरुद्धकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. त्याच्या आगामी सिनेमांमध्ये 'जेलर 2' (Jailer 2), 'द पॅराडाईज' (The Paradise), 'अरसन' (Arasan), 'किंग' (King) आणि 'AA23 x A6' यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. तसेच, त्याचे सिनेसृष्टीशी कौटुंबिक नातंही आहे, तमिळ सुपरस्टार रजनीकांत हे त्याचे काका आहेत. त्यामुळे काव्या मारननं जर अनिरुद्धशी लग्न केलं तर, ती रजनीकांत यांची सुनबाई होणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Abhijeet Dipke On Shah Rukh Khan: अभिजीत दिपकेचं भारतात परतण्याचं 'स्वदेस' कनेक्शन, शाहरुखच्या भूमिकेने प्रेरित होऊन निर्णय!