Abhijeet Dipke On Shah Rukh Khan: सरन्यायाधीशांनी (Chief Justice) 'जेन-झीं'वर (Gen Z) टीका करताना त्यांना झुरळ म्हटलं अन् त्याच झुरळांच्या एका पार्टीनं जन्म घेतला. ती पार्टी म्हणजे, 'कॉकरोच जनता पार्टी' (Cockroach Janta Party). ही पार्टी स्थापन झाल्यापासूनच जोरदार चर्चेत होती. त्यानंतर नीट पेपरफुटीचा (NEET Exam Paper Leak) मुद्दा धरुन या पार्टीनं थेट भारतीय राजकीय विश्वात (Indian Politics) खळबळ उडवून दिली. थेट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं. याच 'कॉकरोच जनता पार्टी'चा संस्थापक अभिजीत दिपके तेव्हापासूनच जोरदार चर्चेत आहे. अभिजीत दिपके मुळचे महाराष्ट्रातला असला तरीसुद्धा शिक्षणासाठी अमेरिकेत होते. पण, ज्यावेळी त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला, त्यामाागे शाहरुख खानचा मोठा वाटा आहे.
'कॉकरोच जनता पार्टी'चा (CJP) संस्थापक अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी सांगितलं की, शाहरुख खानच्या 'स्वदेस' सिनेमाचा (Swades Movie) त्याच्यावर खूप खोलवर प्रभाव पडलेला. या सिनेमातील शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) अभिनयानं ते प्रचंड प्रभावित झालेले आणि अमेरिकेतून भारतात परतण्याचा निर्णय घेण्यामागे शाहरुख खानच्या याच सिनेमाचा मोठा वाटा होता.
15 ऑगस्ट रोजी अभिजीत दिपके यांनी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी 'स्कूल ठीक करो' ही मोहीम सुरू केली. या उपक्रमांतर्गत त्यांनी सरकारी शाळांना भेटी दिल्या आणि विद्यार्थ्यांसाठी पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे आणि बसण्याची योग्य व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं निदर्शनास आणून दिलं.
माझ्यावर शाहरुख खानच्या 'स्वदेस' सिनेमाचा खूप प्रभाव... : अभिजीत दिपके (Abhijeet Dipke On Shah Rukh Khan Movie Swades)
सोशल मीडियावर या मोहिमेचे फोटो शेअर करताना त्यानं 'स्वदेश' सिनेमात फातिमा बीनं कावेरी अम्माला म्हटलेल्या काही ओळी आठवल्या. "बता देना उस लड़के को अपने ही पानी में पिघल जाना बर्फ का मुकद्दर होता है..." अभिजीत दिपकेंनी सांगितलं की, "स्वदेस' पाहतच ते लहानाचे मोठे झाले, हा सिनेमा त्यांच्या मनाला खूप भावला आणि त्यांनी तो शंभरहून अधिक वेळा पाहिलाय... यात एक विशिष्ट बाब अशी आहे, जिचा त्यांच्यावर अत्यंत खोलवर परिणाम झालाय..."
माझ्यावर शाहरुख खानच्या 'स्वदेस' सिनेमाचा खूप प्रभाव पडलाय. मी 'स्वदेस'मधील शाहरूख खानच्या अभिनयानं खूप प्रभावित झालोय. तसेच, माझ्या अमेरिकेहून भारतात परतण्यावर या सिनेमाचा खूप प्रभाव पडलाय, असं अभिजीत दिपके यांनी सांगितलं. स्वातंत्र्य दिनी हिंगोली जिल्ह्यातील आपल्या मूळ गावातून अभिजीत दिपके यानं स्कूल ठिक करो अभियान सुरू केलं. त्यावेळी दिपके यांनी ही आठवण सांगितली.
शाहरुख खानच्या 'स्वदेस' सिनेमाबाबत काय म्हणाले, अभिजीत दिपके? (Abhijeet Dipke On Swades Movie)
अभिजीत दिपके यांनी पोस्टमध्ये नमूद केलंय की, "मोहन जेव्हा हरिदासला भेटायला जातो, तेव्हा त्याला दिसतं की, हरिदास आपल्या कुटुंबाला दिवसातून दोन वेळचं जेवणही देऊ शकत नाही... परतताना ट्रेनमध्ये बसलेला असताना, त्याला स्टेशनवर शाळेत जाण्याऐवजी पाणी विकणारं एक लहान मूल दिसतं... मोहनच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात, अगदी माझ्यासारखेच... प्रत्येक वेळी... तेव्हापासूनच, मोहननं ज्याप्रमाणे चरणपूरसाठी काहीतरी केलं, तसं आपल्या गावासाठीही काहीतरी करण्याची तीव्र इच्छा माझ्या मनात घर करून राहिलीय... त्या काळातही मला याची जाणीव होती की, मी अखेरीस अमेरिकेतून परत येईन आणि माझ्या स्वतःच्या गावासाठी काहीतरी करण्याची संधी मला नक्कीच मिळेल..."
दरम्यान, अभिजीत दिपके 6 जून 2026 रोजी अमेरिकेतून भारतात परतले. त्यांनी बोस्टन युनिव्हर्सिटीमधून Public Relations विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलीय. भारताच्या सरन्यायाधीशांनी (CJI) तरुणांचा उल्लेख 'झुरळं' (Cockroaches) असा केल्यानंतर, दिपके यांनी सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी' स्थापन केली आणि जंतर-मंतर इथे आंदोलन करण्यासाठी ते भारतात आले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
