Amruta Fadanvis New Song : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या गाण्याच्या कायमच चर्चा होत असतात. आपल्या संगीताची आवड जपत अमृता फडणवीस यांनी कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे अमृता फडणवीस यांच्या गाण्यांना सोशल मीडियावरही तितकाच प्रतिसाद मिळतो. नुकतच अमृता फडणवीस यांनी रामनवमीच्या निमित्ताने श्रीरामावरील एक गाणं गायलं आहे. 


अमृता फडणवीस यांच्या या गाण्यात त्यांना कैलाश खेर यांनी देखील साथ दिलीये. त्यामुळे सोशल मीडियावर अमृता फडणवीसांच्या गाण्याची चर्चा आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स देखील केल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक गाणं गायलं होतं. त्यानंतर आता त्याचं हे नवं गाणं आलं आहे. 


अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याची चर्चा


अमृता फडणवीसांनी राम नवमीच्या दिवशी या गाण्याचा व्हिडिओ शेअर केलाय. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी रामभक्तांना शुभेच्छा देखील दिल्या. यावर त्यांनी कॅप्शन लिहिलं की, रामाच्या जपातच सुख आहे, रामाच्या भक्तीतच शांती आहे. त्याचप्रमाणे कैलाश खेरनेही अमृता फडणवीस यांना या गाण्यात साथ दिली आहे.  या व्हिडिओला अमृता फडणवीस यांनी दिलेल्या कॅप्शनेही विशेष लक्ष वेधून घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.                                     






उपमुख्यमंत्र्यांमधील गीतकार चर्चेत


 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लिहिलेलं ‘देवाधी देवा’ हे काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलं होतं.  गाणं अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) आणि शंकर महादेवन यांच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने अमृता फडणवीस आणि शंकर महादेवन यांनी गायलेले‘देवाधी देवा’  गाणे रिलीज झाले खरे मात्र चर्चा सुरू झाली ती देवेंद्र फडणवीस यांच्या गीतकार असल्याची. देवाधीदेवा या गाण्याचे बोल देवेंद्र फडणवीसांनी लिहले आहेत. यामुळे ऐरवी महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील ‘डिरेक्टर’ असलेले देवेंद्र फडणवीस आता गीतकार झाले आहेत.


ही बातमी वाचा : 


Malaika Arora Marriage : 'मला तुझ्या लग्नाची तारीख सांग', लेक पाहतोय मलायकाच्या दुसऱ्या संसाराची स्वप्न; उत्तर देताना म्हणाली,'या प्रश्नाचं उत्तर...'