Amruta Fadanvis New Song : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) या नेहमीच चर्चेत असतात. मात्र, या वेळेस चर्चा आहे ती त्यांच्या नवीन गाण्याची. अमृता फडणवीस यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. नुकतंच त्यांचं "आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे"" हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतोय. 


"आज मैं मूड बना लिया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे" हे एक पार्टी सॉंग आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांचा वेगळा आणि हटके अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अमृता फडणवीस यांनी या गाण्यात डान्सही केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अमृता फडणवीस यांचा वेगळा अंदाज या गाण्यातून पाहायला मिळणार आहे. 


अमृता फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नवीन गाण्याचं पोस्टर सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलं होतं. त्यांच्या गाण्याचं टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. अमृता फडणवीसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा टीझर शेअर केला होता. या टीझरमध्ये अमृता फडणवीस गाण्याबरोबरच डान्सही करताना दिसत आहेत. त्यांच्या नव्या आणि बदललेल्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अखेर हे गाणं आज रिलीज झालं आणि या गाण्याला चांगला प्रतिसादही मिळतोय. 


पाहा व्हिडीओ : 



गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन


अमृता फडणवीस यांना गाण्याची फार आवड आहे. त्या नेहमी आपल्या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. कधी त्यांची गाणी प्रेक्षकांना आवडतात. तर, कधी त्यांच्या गाण्यावर टीकाही होते. मात्र, त्यांनी त्यांच्या गाण्याची आवड कायम जपली आहे. बातमी लिहेपर्यंत या गाण्याला 2 लाख 20 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच, 22 हजार 191 यूजर्सने या गाण्यावर कमेंट्सही केल्या आहेत.  


अमृता फडणवीस या पेशाने बॅंकर असून त्या गायिकाही आहेत. त्यांनी गायलेल्या अनेक गाण्यांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.


महत्त्वाच्या बातम्या : 


Shehzada Trailer : कार्तिक आर्यनचा धमाकेदार चित्रपट 'शेहजादा' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; 12 जानेवारीला ट्रेलर होणार रिलीज