PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने (PM Kisan Samman Nidhi ) अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्ते मिळाले आहेत. 13 वा हप्ता कधी मिळणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. याबाबत सुत्रांकडून महत्वाची माहिती मिळत आहे.  मकर संक्रांतीपूर्वी (Makar Sankranti) म्हणजे 15 जानेवारीच्या आत 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती सुत्रांनी दिली आहे. मकर संक्रांतीच्या आधी हप्ता जमा झाल्यास आठवडाभरातच शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता आहे.


देशातील सर्वात मोठ्या योजनांपैकी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील अल्पभूधारकर शेतकऱ्यांना दरवर्षी टप्प्याटप्यानं आर्थिक लाभ दिला जातो. चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हप्ते जमा झाले आहेत. 13 वा हप्ता कधी मिळणार याबाबत चर्चा सुरु आहेत. अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार मकर संक्रांतीच्या आत 13 वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या योजनेत काही लोकांनी आतापर्यंत फसवेगिरी करुन पैसे मिळवले आहेत. असा चुकीचा लाभ घेतलेल्या लोकांची नावे त्या-त्या राज्यांनी जाहीर केली आहेत. आता त्या लोकांकडून पैसे परत घेतले जात आहेत. त्यामुळं यावेळी त्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत. 


ऑक्टोबरमध्ये जमा झाला होता 12 वा हप्ता


17 ऑक्टोबर 2022 ला शेतकऱ्यांच्या खात्यात 12 वा हप्ता जमा झाला होता. त्यावेळी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती. हा शेतकऱ्यांना मिळालेला 12 वा हप्ता होता. दरम्यान, अद्याप हजारो शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.  ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना 11 वा आणि 12वा हप्ता मिळालेला नाही. जवळपास 1 कोटी 86 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.


शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणं गरजेचं


PM Kisan योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्ही ई-केवायसी केली पाहिजे. तुम्ही जर ई-केवायसी पूर्ण केली नाहीतर तुम्हाला 13 वा हप्ता मिळणार नाही. प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तुम्ही PM Kisan.gov.in या वेबसाईटला भेट देऊन किंवा तुमच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ई-केवायसी करु शकता.


महत्त्वाच्या बातम्या:


PM Kisan Scheme : तब्बल 4 कोटी 50 लाख शेतकऱ्यांना PM किसानचा 12 वा हप्ता मिळालाच नाही, कागदपत्रांची पूर्तता करण्याचं आवाहन