Radhe Shyam Update : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) यांच्या आगामी ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) या चित्रपटाचा भाग असणार आहेत. बिग बींकडे चित्रपटातील कथाकाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंगळवारी चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हँडलने या वृत्ताला दुजोरा दिला. अमिताभ बच्चन यांच्या 1975मधील ‘दिवार’ या चित्रपटातील एक पोस्टर शेअर करताना, निर्मात्यांनी अमिताभ बच्चन यांचे आभार मानले. "#राधे श्यामच्या व्हॉइसओव्हरबद्दल शहेनशाह @SrBachchan धन्यवाद," असे ट्विटमध्ये लिहिले आहे.
एका मुलाखतीत दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांनी बिग बींना या प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेण्याचे कारण स्पष्ट केले. “चित्रपट 1970च्या दशकात सेट करण्यात आला आहे. त्यामुळे आम्हाला अशा आवाजाची गरज होती, जो भारदस्त वाटेल आणि अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा चांगला आवाज आणखी कोणाचा असेल? अमिताभ बच्चन, असा आवाज आहेत, ज्याला प्रत्येकजण ओळखतो, आदर करतो. राधे श्यामचे कथाकार म्हणून बिग बींचा सहवास लाभल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे,” असे ते म्हणाले.
अमिताभ बच्चन, प्रभाससोबत सायन्स फिक्शनवर आधारित आगामी चित्रपटात झळकणार आहेत. अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रभास एक प्रतिभावान आणि नम्र कलाकार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'महानती' चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते नाग अश्विन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत
सध्या या चित्रपटाचे नाव 'प्रोजेक्ट के'
या नवीन चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसून, त्याला 'प्रोजेक्ट के' असे म्हटले जात आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अमिताभ यांनी ट्विट करून ही माहिती दिली आणि चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रभासकडून खूप काही शिकण्यास उत्सुक असल्याचे म्हटले.
हेही वाचा :
- Shaakuntalam : समंथा रूथ प्रभूच्या 'शकुंतलम' सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित, समंथाच्या लूकने लावले चारचॉंद
- Upcoming Movies on OTT: 'बच्चन पांडे' ते 'गंगूबाई काठियावाडी' पर्यंत 'हे' सिनेमे होणार ओटीटीवर प्रदर्शित
- Samantha : नेटकऱ्याचा अजब सवाल ; समंथा म्हणाली, 'आधी गूगलवर सर्च कर'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha