Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती देखील मिळते. नुकतीच अमिताभ यांनी सोशल मीडियावर सुप्रभात अशी पोस्ट शेअर केली. या पोस्टला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी अमिताभ यांना ट्रोल केलं. या ट्रोलर्सला बिग बींनी हटके स्टाईलनं उत्तर दिलं.
नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
अमिताभ बच्चन यांनी 'सुप्रभात' असं लिहिलेली पोस्ट शेअर केली. या पोस्टला कमेंट करुन एका नेटकऱ्यांनी अमिताभ यांना ट्रोल केलं. त्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'अबे बुढ्ढे दोपहर हो गयी' नेटकऱ्याच्या या पोस्टला बिग बींनी रिप्लाय दिला, 'मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो की, तुमचे वय वाढल्यानंतर तुम्हाला कोणीही म्हातारा म्हणू नये.'
तर नेटकऱ्यानं बिग बींच्या पोस्टला कमेंट केली, 'तुम्हाला असं नाही वाटत का की खूप लवकरच तुम्ही सुप्रभात ही पोस्ट शेअर केली.' यावर बिग बी म्हणाले, 'तुम्ही मारलेल्या टोमण्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. पण मी रात्री उशिरापर्यंत शूटिंग करत होतो. त्यामुळे सुप्रभात करायला उशिर झाला. मी त्यामुळे तुमची माफी मागतो.'
एक नेटकरी म्हणाला, 'असं वाटतं आहे तुमचे SUMMER HOLIDAYS सुरू झाले आहेत त्यामुळे तुम्ही उशिरा उठला.' यावर अमिताभ म्हणाले, 'नाही, मी रात्री काम करत होतो. त्यामुळे उशिरा उठलो. '
काही दिवसांपूर्वी अमिताभ यांचा झुंड हा चित्रपट प्रेक्षरकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेनं केलं आहे. चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच अमिताभ यांचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ यांच्यासोबतच आलिया भट, रणबीर कपूर मौनी रॉय आणि नागार्जुन यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच बिग बींचा रन-वे 34 हा चित्रपट देखील काही दिवसांपूर्वी रिलीज झाला.‘रनवे 34’ हा अजय देवगण दिग्दर्शित आणि निर्मित चित्रपट आहे.
हेही वाचा :
- Irsal : बहुचर्चित 'इर्सल' चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार चित्रपट रिलीज!
- Dharmaveer : 'धर्मवीर'ची भुरळ मुख्यमंत्र्यांनाही; सिनेमा पाहायला उद्धव ठाकरे अन् रश्मी ठाकरे थेट सिनेमागृहात
- Dharmaveer : एका धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रगाथा! 'धर्मवीर'ने पहिल्याच दिवशी केली तब्बल 2.5 कोटींची कमाई