Amitabh Bachchan Meet Dharmendra: बॉलिवूडचा (Bollywood) 'ही-मॅन' (He-Man) आणि तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा सुपरस्टार धर्मेंद्र (Dharmendra) यांची प्रकृती सध्या नाजूक आहे. तब्बल अकरा दिवस मुंबईतील (Mumbai News) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार घेतल्यानंतर सध्या धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Dharmendra Discharged From Hospital) देण्यात आला आहे. आता धर्मेंद्र यांच्यावर इथून पुढचे उपचार त्यांच्या घरी होतील, अशी माहिती देओल कुटुंबीय आणि रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. 

Continues below advertisement

धर्मेंद्र घरी परतण्यानं चाहत्यांना काहिसी दिलासा मिळाला असला तरीसुद्धा आपल्या लाडक्या सुपरस्टारच्या प्रकृतीची चिंता देओल कुटुंबीयांइतकीच त्यांच्या चाहत्यांनाही आहेत. त्यामुळे धर्मेंद्र यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी सर्व चाहते देवाचा धावा करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून 89 वर्षीय धर्मेंद्र यांना वयोमानाशी संबंधित आजारांमुळे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे त्यांच्यावर आघाडीच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. सलमान खान, शाहरुख खान आणि गोविंदा यांच्यासह अनेक स्टार्सनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयाला भेट दिली.

वीरुच्या भेटीसाठी जय धावला (Amitabh Bachchan Meet Dharmendra)

12 नोव्हेंबर रोजी, बॉलिवूडच्या 'ही-मॅन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि ते घरी परतले. जिथे डॉक्टरांची एक टीम त्यांची काळजी घेत असल्याचं पाहायला मिळालं. धर्मेंद्र परतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अमिताभ बच्चन हे सर्वात आधी पोहोचले. अमिताभ बच्चन धर्मेंद्र यांच्या जुहूच्या घरी स्वतः गाडी चालवत पोहोचले आणि आपल्या लाडक्या वीरूची भेट घेतली. क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जाणाऱ्या 'शोले' सिनेमातील गाजलेली जय-वीरूची जोडी म्हणजे, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची जोडी. सिनेमात जेवढे दोघे एकत्र, एकमेकांसोबत दिसले, तेवढेच खऱ्या आयुष्यातही दोघे एकमेकांच्या तितकेच जवळ होते. जेव्हापासून धर्मेंद्र आजारी होते, तेव्हापासूनच अमिताभ बच्चन चिंतेत होते. अखेर मित्र रुग्णालयातून घरी परतल्यावर अमिताभ बच्चन धर्मेंद्र यांची भेट घेण्यासाठी तात्काळ पोहोचले. त्यावेळचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण, अमिताभ बच्चन स्वतः गाडी चालवत धर्मेंद्र यांच्या घरी पोहोचल्याचं पाहून चाहते मात्र, चांगलेच संतापले आहेत.

Continues below advertisement

अमिताभ बच्चन यांनी घेतली धर्मेंद्र यांची भेट (Amitabh Bachchan At Dharmendra Bungalow)

बुधवारी धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी धर्मेंद्र यांच्या घराबाहेर अमिताभ बच्चन पॅपाराझींच्या गराड्यातून स्वतः गाडी चालवत धर्मेंद्रंच्या भेटीसाठी पोहोचले. 83 वर्षांचे अमिताभ बच्चन दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्यांच्या बीएमडब्ल्यूमधून निघून गेले. दरम्यान, बच्चन यांनी त्यांचा पाठलाग करणाऱ्या कोणत्याही पॅपाराझींना दुखापत होऊ नये याची काळजी घेतली आणि त्यांनी सहज गाडी चालवली.  

धर्मेंद्र यांच्यासाठीची अमिताभ बच्चन यांची घट्ट मैत्री चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेत आहे. पण, दुसरीकडे चाहते मात्र अमिताभ यांच्यावर नाराज झाले आहेत. अमिताभ बच्चन यांना स्वतः गाडी चालवत असल्याचं पाहून चाहते संतापले. एका युजरनं लिहिलंय की, "तुमचा ड्रायव्हर कुठंय अमिताभ जी... ऐश्वर्या-अभिषेक आणि जया जींसोबत ड्रायव्हर असतो, मग तुमच्यासोबत का नाही?"

युजर्स भडकले (Users Angry On Bigg B)

अमिताभ बच्चन 83 वर्षांचे आहेत आणि इतक्या गर्दीतून गाडी चालवल्यानं चाहते चिंतेत आहेत. चाहते बिग बी आणि धर्मेंद्र यांच्या खऱ्या मैत्रीचे कौतुक करत आहेत, त्यांना 'खरे दिग्गज' आणि 'जय-वीरू' म्हणत आहेत, तर चाहते त्यांना इतक्या मोठ्या गर्दीतून गाडी चालवू नका असा सल्ला देत आहेत. 

दरम्यान, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी केवळ शोलेमध्येच नव्हे तर 'चुपके चुपके', 'राम बलराम' आणि 'नसीब' सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्येही एकत्र काम केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Sunny Deol Angry On Paparazzi: Sunny Deol Angry On Paparazzi: 'लाज वाटायला हवी...', घराबाहेर उभ्या असलेल्या पॅपाराझींवर सनी देओल भडकला; आधी हात जोडले मग, सुनव सुनव सुनवलं