Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) एखादी भूमिका साकारण्यासाठी प्रचंड भूमिका घेताना दिसता.. असाच 1991 सालचा किस्सा आहे. जेव्हा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) एक अ‍ॅक्शन क्राइम फिल्म घेऊन आले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत (Amitabh Bachchan) रजनीकांत, गोविंदा, किमी काटकर, दीपा शाही, शिल्पा शिरोडकर आणि अनुपम खेर यांसारखे अनेक मोठे कलाकार होते. या चित्रपटासाठी बिग बींना (अमिताभ बच्चन) फिल्मफेअरचा सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला होता, तर कोरिओग्राफर चीनी प्रकाश यांना एका गाण्यासाठी सर्वोत्तम कोरिओग्राफरचा पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट 1991 मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटातील कलाकार आणि कथानकाबरोबरच सर्वाधिक चर्चेत राहिले ते म्हणजे यातील एक गाणं.

भुकेल्या अवस्थेत शूट करण्यात आलं होतं हे लोकप्रिय गाणं

हे गाणं होतं – ‘जुम्मा चुम्मा दे दे’. हे गाणं आनंद बक्षी यांनी लिहिलं होतं आणि त्याला संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी. हे गाणं सुदेश भोसले आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलं होतं. हे गाणं इतकं सुपरहिट झालं की ते प्रत्येक घरात वाजू लागलं. ‘जुम्मा चुम्मा दे दे’ या गाण्याच्या यशाबाबत गायक सुदेश भोसले यांनी एका टीव्ही शोमध्ये सांगितलं की, त्यांनी हे गाणं 17 तास उपाशी राहून पूर्ण केलं होतं.

गाण्याने घरोघरी धुमाकूळ घातला

गाणं रेकॉर्ड करताना अमिताभ बच्चन समोर असल्यामुळे सुदेश भोसले खूपच नर्वस झाले होते. ‘जुम्मा चुम्मा दे दे’ हे गाणं रेकॉर्ड होत असताना बिग बी अधूनमधून स्टुडिओमध्ये येत होते. त्यामुळे सुदेश अजूनच तणावात गेले आणि त्यांनी 17 तासांच्या प्रयत्नांनंतर हे गाणं पूर्ण केलं. त्या दरम्यान त्यांनी तब्बल 25 कप चहा पिऊन घेतले. सुदेश यांनी हसत सांगितलं की त्यानंतर त्यांना अ‍ॅसिडिटीही झाली होती.

या गाण्याबाबत एक प्रसिद्ध कथा आहे की, हे गाणं सुरुवातीला ‘अग्निपथ’ चित्रपटासाठी लिहिण्यात आलं होतं. सर्व तयारी झालेली होती, पण दिग्दर्शकाला वाटलं की अमिताभ बच्चन ज्या प्रकारचं पात्र साकारत आहेत, त्यावर हे गाणं बसत नाही. त्यामुळे तेव्हा हे गाणं वापरता आलं नाही. त्याऐवजी ‘अग्निपथ’मध्ये ‘अली बाबा’ हे गाणं घेतलं गेलं, ज्यामध्ये अर्चना पूरणसिंग दिसल्या होत्या. या गाण्यानंतर अभिनेत्री किमी काटकर प्रत्येक घरात प्रसिद्ध झाली. लोकांनी तिला ‘जूम्मा गर्ल’ म्हणायला सुरुवात केली. या गाण्यात ती अमिताभ बच्चनसोबत झळकली होती आणि दोघांची जोडी प्रेक्षकांनी खूपच पसंत केली.