Crime News : आरोग्य विभागात (Health Department) नोकरी (Job) मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल 90 जणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सुमारे दीड कोटी रुपयांचा आर्थिक अपहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. फसवणूक करणाऱ्यांनी नाशिक (Nashik) आणि धुळे (Dhule) जिल्ह्यांतील आरोग्य विभागात विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. या गंभीर प्रकाराबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station) कविता भदाणे आणि वैभव पोळ या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी भरती प्रक्रियेसाठी माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांचे नाव वापरल्याचा संशय आहे. या प्रकरणाची तक्रार कुणाल भदाणे यांनी नोंदवली असून, त्यांच्या तक्रारीनंतर सरकारवाडा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून, आरोपींनी आणखी किती जणांची फसवणूक केली आहे आणि या प्रकरणात इतर कोणी गुन्ह्यात सामील आहे का? याचा तपास सुरू आहे.

दीड कोटी रुपयांचा अपहार

याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी म्हटले आहे की, दि. 29 मे 2025 रोजी कुणाल भदाणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल भदाणे हे साक्री परिसरात डॉक्टर आहेत. त्यांच्या ओळखीच्या अनेक तरुणांनी त्यांची नातेवाईक असलेली कविता भदाणे हिच्याकडे नोकरीला लावण्यासाठी पैसे जमा करून दिले होते. आरोपी महिलेने आरोग्य विभागात सफाई कामगार, ड्रायव्हर, लॅब टेक्निशियन अशा वेगवेगळे पदांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाले असल्याचे सांगून वेगवेगळ्या लोकांकडून पैसे घेतले.  ठराविक मुदत उलटून गेल्यानंतर आरोपींनी काम देखील केले नाही आणि पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली. यानंतर तरुणांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टर कुणाल भदाणे यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. यात किमान 90 लोकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. सुमारे दीड कोटी रुपयांचा अपहार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Crime : पुण्यानंतर नाशिकमध्ये कोयता गँगचा धुमाकूळ, दोन ठिकाणी वाहनांची तोडफोड, तरुणावर हल्ला, दहशत मोडून काढण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान

Pune Crime News: पुण्यातील ज्वेलर्समधून कर्मचारी हळूहळू वस्तू लंपास करत राहिला, कधी अंगठी, कधी कॉईन... साडेचार कोटींची चोरी