Gopichand Padalkar :  भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी 5 वर्षापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वादग्रस्त वक्तव्याच्या आरोपातून आमदार गोपीचंद पडळकर यांची बारामती न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2020 मध्ये कोरोनाच्या काळात शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले होते. त्यानंतर पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

Continues below advertisement


चार साक्षीदार तपासल्यानंतर आज अंतिम निकाल जाहीर


राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर  पोलिसांनी त्यांना बारामती कोर्टात दाखल केले होते. मात्र, या केस संदर्भात जामीन घेतल्यानंतर वारंवार समन्स बजावून देखील पडळकर यांनी न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळं कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते. दरम्यान पडळकर यांच्या वादग्रस्त विधानाची केस बारामतीच्या कोर्टात सुरु झाली. चार साक्षीदार तपासल्यानंतर आज याबाबतचा अंतिम निकाल जाहीर केला. त्यामध्ये  पडळकर यांनी केलेल्या विधानामुळे कोणतेही जातीय दंगे भडकले नाहीत, त्यांचे विधान हे व्यक्तीसाठी होते, त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण झाला नाही, असं निरीक्षण नोंदवत पडळकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.


नेमकं काय म्हणाले होते गोपीचंड पडळकर?


शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून ते महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत आणि राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिली आहे आणि पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे ना कुठली विचारधारा आहे, ना कुठला अजेंडा आहे, ना कुठलं व्हिजन आहे. फक्त छोट्या छोट्या समूह गटांना भडकावायचं आपल्या बाजूला करणं, त्यांच्यावरच अन्याय करायची अशी त्यांची भूमिका आहे. मला वाटत नाही ते धनगर आरक्षणाबाबत ते पॉझिटिव्ह असतील असं मला वाटत नाही. त्यांना फक्त धनगर समजाच्या आरक्षणाचं राजकारण करायचं आहे असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर  पोलिसांनी त्यांना बारामती कोर्टात दाखल केले होते. 


महत्वाच्या बातम्या:


Gopichand Padalkar : सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी; मुघलांच्या खुणा असलेल्या गावांची नावे बदलण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार : गोपीचंद पडळकर