मुंबई : बॉलिवुडची संदरा अमिषा पटेलने आपला काळ गाजवला. तिच्या चित्रपटाची देशभरातील तरुण आतुरतेने वाट पाहायचे. तिच्या अभिनयाचे आजही तेवढेच दिवाने पाहायला मिळतात. या अभिनेत्रीचा नुकताच गदर-2 हा सिनेमा आला. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. दरम्यान, आता अमिषा पटेल एका आगवळ्या-वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. 49 वर्षांची अमिषा पटेल आता 19 वर्षांच्या निवाण बिर्लाला डेट करतेय की काय? असे विचारले जात आहे. याच चर्चेवर आता खुद्द निर्वाणनेच स्पष्टीकरण दिले आहे.
अमिषा पटेल निर्वाणला म्हणाली डार्लिंग
अमिषा पटेलने आतापर्यंत लग्न केलेलं नाही. याआधी या अभिनेत्रीचे नाव अेकदा इतर अभिनेत्यांशी जोडण्यात आलंय. गेल्या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात ही अभिनेत्री 19 वर्षाच्या निर्वाण बिर्ला या उद्योजकाला डेट करतेय असे म्हटले जात होते. अमिषा पटेलने 13 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर निर्मा बिर्लासोबतचे काही फोटो पोस्ट केले होते. सोबतच या फोटोलो तिने खास असे कॅप्शन दिले होते. 'दुबई- माझी प्रिय व्यक्ती (डार्लिंग) निर्वाण बिर्लासोबतची सुंदर संध्याकाळ' असं अमिषाने आपल्या इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. तेव्हा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. याच फोटोचा आधार घेत अमिषा पटेल ही निर्वाणला डेट करतेय अशी चर्चा रंगली होती. अशा प्रकारच्या अफवांना पेव फुटले होते.
निर्वाणनेच दिले स्पष्टीकरण
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अमिषा पटेल आणि निर्वाण यांच्या डेटिंगच्या चर्चा चालू होत्या. याच चर्चेवर आथा निर्वाणने स्पष्टीकरण देऊन पडदा टाकला आहे. मी आणि अमिषा पटेल एकमेकांना डेट करत नाहीत. आम्ही दोघेही फॅमिली फ्रेन्ड्स आहोत. आम्ही दुबईत एका अल्बमच्या शूटसाठी भेटलो होते, असे निर्वाणने स्पष्ट केले आहे. यासोबतच माझे वडील अमिषा पटेलला तिच्या शालेय जीवनापासून ओळखतात. आम्ही दोघे दुबईत सोबत होते. म्युझिक अल्बमच्या सूटिंगसाठी आण्ही एकत्र आलो होतो, असंही त्यांने सांगितलं.
निर्वाण बिर्ला हा दिग्गज उद्योगपती यशवर्धन बिर्लाचा मुलगा आहे. निर्वाण आपल्या वडिलांचा उद्योग सांभाळतो. निर्वाण बिर्ला चांगाल गायकही आहे. तर दुसरीकडे अमिषा पटेलचा याआधी गदर-2 हा चित्रपट आला होता. त्यानंतर ती तौबा तेरा जलवा या चित्रपटातही दिसली होती.
हेही वाचा :
भारताची नवी नॅशनल क्रश होणार रणवीर सिंहची हिरोईन? 'शक्तिमान' चित्रपटात दिसण्याची दाट शक्यता!