Urmila Matondkar : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत आली आहे.कारण जवळपास लग्नाला आठ वर्ष झाल्यानंतर उर्मिला आणि तिचा नवरा मोहसीन मीर अख्तर यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय. त्यांच्या नात्याविषयी सध्या बरीच चर्चा सुरु आहे. त्यातच आता उर्मिलाविषयी आणखी एक चर्चा सुरु झाली आहे.
लवकरच हिंदी बिग बॉसचा 18 सीझन सुरु होणार आहे. त्यामुळे उर्मिला आता हिंदी बिग बॉसमध्ये एन्ट्री घेणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे आता वैयक्तिक आयुष्यानंतर उर्मिला बिग बॉसच्या घरात दिसणार असल्याची चर्चा सुरु झालीये. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे उर्मिला आता बिग बॉसच्या घरात दिसणार का? याची उत्सुकता सध्या तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.
उर्मिला बिग बॉसची ऑफर?
उर्मिला लवकरच ओटीटी किंवा मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जातंय. पण त्यातच आता उर्मिला बिग बॉसमध्ये दिसणार असल्याचंही म्हटलं जातंय. त्यामुळे उर्मिला छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. बिग बॉस हिंदीच्या निर्मात्यांनी उर्मिलाला या शोसाठी ऑफर दिली असल्याच्या चर्चा आहेत.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा घटस्फोट
उर्मिला तिचा पती मोहसिन अख्तर मीर याला घटस्फोट देणार आहे. उर्मिलाने मुंबई न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. उर्मिलाने 2016 मध्ये बिझनेसमन मोहसिन मीरसोबत लग्न केले. आता एका रिपोर्टनुसार उर्मिला लग्नाच्या 8 वर्षांनंतर तिच्या पतीपासून विभक्त होणार आहे.
दोघांच्या वयात 10 वर्षांचा फरक
उर्मिला मातोंडकर आणि मोहसिन अख्तर मीर यांनी 4 फेब्रुवारी 2016 रोजी गुपचूप लग्न उरकलं होतं. त्यावेळी त्यांच्या लग्नाने खूप चर्चा झाली होती, कारण दोघेही वेगवेगळ्या धर्माचे होते. याशिवाय दोघांच्या वयात 10 वर्षांचा फरक होता. खरं तर उर्मिला पती मोहसिनपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे.
ही बातमी वाचा :