Amey Wagh on Social Media Influencers: मराठी अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) आपल्या खास शैलीतील अभिनयासाठी (Entertainment) ओळखला जातो. 'दिल दोस्ती दुनियादारी' (Dil Dosti Duniyadari) या मालिकेतून त्याला विशेष ओळख मिळाली. त्यानं आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकापासून केली असून, आता ओटीटी विश्वातही अमेयनं नाव कमावलं आहे.  अमेयनं आपल्या कारकि‍र्दीत अनेक सिनेमांमध्येही काम केलंय. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियात रिल तयार करुन अनेक लोक लाखो रुपये कमवतात.  अनेक कंटेट क्रिएटर्सने सिनेमातही आपले नशीब आजमावले आहे. आजकाल सोशल मीडिया  इन्फ्ल्युएंसरना कलाकारांपेक्षा जास्त मानधन मिळते, असं अमेय वाघ एका मुलाखतीत म्हणाला.  अमेय नेमकं काय म्हणाला? पाहूयात.

Continues below advertisement

इन्फ्लुएंसरच्या  कमाईचं वास्तव अमेय वाघनं सांगितलं (Amey Wagh on income of influencers)

नुकतंच अमेयने 'दॅट ऑड इंजिनिअरला' मुलाखत दिली होती.  या मुलाखतीत त्यानं कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यांना मिळत असलेल्या मानधनाबद्दल भाष्य केलं आहे. 'यूट्यूबर खूप पैसे कमवतात. त्यांना पेमेंट डॉलर्समध्ये मिळते. यूट्यूब या माध्यमांत जेवढा पैसा आहे, तेवढा पैसा कोणत्याही कलाकारा मिळत नसेल.  एवढं चांगलं नशीब अभिनेत्याचं नाही. सध्या यूट्यूबर्स आणि इन्फ्लुएंसर जास्त पैसे  कमवतात'.

'सध्याच्या स्थितीत कोणते कलाकार जास्त मानधन घेत आहेत, माहित नाही. पण आठवड्याला मी आयफोन घेऊ शकत नाही.  माझ्याकडे एकच आयफोन आहे. हा आयफोन देखील मला माझ्या बायकोनं गिफ्ट केला आहे', असं अमेय वाघ म्हणाला. 'मी प्रोमोशन वगैरे असं करुन चिरीमिरी कमवतो.    मी हॉटेलमध्ये पार्टी नाही पण घरी बोलावून चांगला पाहुणचार करु शकतो', असं मिश्किल उत्तरही अमेय वाघनं दिलं.

Continues below advertisement

काळानुसार  मनोरंजनाची पद्धत बदलत चालली आहे (Actor v/s Influencer income) 

इंडस्ट्रीत इन्फ्लुएंसरची संख्या वाढत असल्यामुळे कलाकारांना याची भीती वाटते का? या प्रश्नाचं उत्तर देताना अमेय म्हणाला, 'या बद्दल भीती असं काही नाही. कारण ज्याला जे काही मिळायचं आहे ते मिळतं. पूर्वी नाटक खूप गाजत होते. नंतर सिरिअल सुरु झाले.  तेव्हा नाटकातील कलाकारांना  असं वाटलंच असेल की, आता टीव्हीतील कलाकारांना जास्त पैसे मिळतील. सिरिअल्सनंतर ओटीटी आलं. काळानुसार  मनोरंजनाची पद्धत बदलत चालली आहे', असंही अमेय वाघ म्हणाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

हॉरर - कॉमेडीचा जबरदस्त तडका, बॉक्स ऑफिसवर 'तुंबाडच्या मंजुळे'चा दबदबा, किती कमावले?