Tumbadchi manjula: 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) आणि देऊळ बंद (Deool Band) या मराठी सिनेमांना बॉक्स ऑफिसवर (Box Office) मिळालेल्या प्रचंड यशानंतर 'तुंबाडची मंजुळा' (Tumbadchi Manjula) या सिनेमाची सध्या सिनेसृष्टीत हवा आहे. 'तुंबाडची मंजुळा' या हॉरर कॉमेडी सिनेमानं बॉक्स ऑफिसला पछाडलं आहे. 5 जून रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता. विकेंडला या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामगिरी केली. विकेंडनंतर आता या सिनेमानं विकडेज म्हणजेच सोमवारीही चांगली कामगिरी केली आहे. रविवारी या सिनेमानं 1.93 कोटींचा गल्ला जमवला आहे. दरम्यान, या सिनेमाच्या कमाईत किंचित घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी या सिनेमानं नेमके किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
'तुंबाडच्या मंजुळे'नं बॉक्स ऑफिसला पछाडलं (Tumbadchi Manjula 4th day Collection)
'तुंबाडची मंजुळा' या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती पाहायला मिळत आहे. 5 जून म्हणजेच शुक्रवारी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. पहिल्या दिवशी या सिनेमानं 60 लाखांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तर, दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या दिवशी या सिनेमानं 1.10 कोटींचे कलेक्शन केले.
तर, तिसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झाली. रविवारी या चित्रपटानं 1.93 कोटींचे कलेक्शन केले. दरम्यान, सोमवारी विकेंडच्या तुलनेत सिनेमाच्या कमाईत किंचित घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंडनुसार, सोमवारी या सिनेमाचे 600 शो पार पडले होते. दरम्यान, चौथ्या दिवशी या सिनेमानं 84 लाखांचे कलेक्शन केले आहे. आतापर्यंत या सिनेमानं 3.97 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
हॉरर कॉमेडी या सिनेमात विविध कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात हॉररसोबत कॉमेडीचाही तडका आहे. विशेष म्हणजे या सिनेमात अर्थव रुके याचीही महत्त्वाची भूमिका आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन विविध कारेगावकर यांनी केले असून, या सिनेमाला सध्या प्रेक्षकांची पसंती पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
राम चरणच्या 'पेद्दी'ची हवा; सोमवारीही सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुसाट, 200 कोटींचा आकडा पार करणार?
