Ameesha Patel Reveals Rejected Tere Naam: बोल्ड अदा आणि अभिनयातून  प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री अमिषा पटेलचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिनं आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच हिट चित्रपटात काम केलं.  तिनं अलिकेडच दिलेल्या मुलाखतीत 'तेरे नाम' या चित्रपटाविषयी खूप मोठा खुलासा केला.  तिला हा सिनेमा ऑफर करण्यात आला होता, असं तिनं आपल्या मुलाखतीत म्हटलं. मात्र, हा सिनेमा तिने नाकारला होता. दरम्यान, हा सिनेमा नाकारल्याचा पश्चाताप आजही होतो, असं तिनं मुलाखतीत सांगितलं. 2003 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा सुपरहिट ठरला.  'तेरे नाम' या चित्रपटामुळे सलमान खानच्या करिअरलाही नवीन दिशा मिळाली होती. 

Continues below advertisement

अमिषाने मुलाखतीत, हा सिनेमा सुरुवातीला तिलाच ऑफर करण्यात आला होता, असं सांगितलं. मात्र, काही परिस्थितींमुळे या प्रोजेक्टचा भाग होता आलं नाही, अशी माहिती तिने दिली. आता, अनेक वर्षांनंतर  अभिनेत्रीने या चित्रपटाविषयी खुलासा केला. अमिषाने अलिकडेच 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली होती.  या मुलाखतीत तिनं सांगितलं की, 'जेव्हा सलमान खानने तेरे नाम या सिनेमाची ऑफर दिली होती, तेव्हा हा चित्रपट अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर होता. या सिनेमाची गाणी तयार झाली होती'.

अमिषा पटेलने 'तेरे नाम' हा सिनेमा का नाकारला होता? (Why Ameesha Patel did not do Tere Naam movie)

'सलमानकडे या कथेची कल्पना होती. सलमान स्वत: या प्रोडेक्टबद्दल खूप उत्सुक होता. त्याने या सिनेमाची गाणीही ऐकवली. गाणी आवडली होती.  परंतु, चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल फिक्स झाले नव्हते.  'तेरे नाम' या सिनेमाचं दिग्दर्शन कोण करणार? हे देखील ठरलं नव्हतं', असं अमिषा आपल्या मुलाखतीत म्हणाली.  डेट्सच्या कमतरतेमुळे हा सिनेमा अमिषा करु शकली नाही.  दिग्दर्शक ठरत नव्हता. दिग्दर्शकांच्या नावांवर चर्चा झाल्यामुळे  चित्रपटाच्या शूटिंगला  बराच काळ विलंब झाला होता. 

Continues below advertisement

'एक अभिनेत्री म्हणून मी सुरुवातीला ऑफर करण्यात आलेल्या चित्रपटांना होकार दिला होता.  मी माझ्या शूटिंग डेट्स इतर निर्मात्यांना दिल्या होत्या.  'तेरे नाम' चित्रपटाच्या शूटिंगबाबत काहीच ठरत नव्हतं. कधी वाटायचं लवकर सुरू होईल,   कधी वाटायचं विलंब होईल.  त्यामुळे अनिश्चित प्रोजेक्टसाठी माझे इतर साइन केलेले प्रोजेक्ट सोडून देणं हे मला शक्य नव्हतं', असं अमिषाने स्पष्ट केलं. 

अमिषा पटेल दुसऱ्या चित्रपटात व्यस्त (Ameesha Patel regret missed blockbuster Film)

'चित्रपटाचे सगळं फायनल झालं,   सतीश कौशिक यांनी दिग्दर्शक म्हणून पदभार स्वीकारला, तेव्हा खूप उशीर झाला होता.  मी तेव्हा दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त होते', असं अमिषाने सांगितलं.  'तेव्हा या सिनेमाची फिक्स डेट आणि दिग्दर्शक फायनल झाले असते, तर मी इतका सुंदर आणि हिट चित्रपट आणि सलमान खानसोबत काम करण्याची संधी कधीच गमावली नसती. खरंतर हे माझ्यासाठी खूप मोठे नुकसान आहे', अशी खंत अमिषा पटेलने व्यक्त केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

हॉरर - कॉमेडी 'भूत बंगला' सिनेमाची 100 कोटी कल्बमध्ये एन्ट्री; 'धुरंधर'ला टक्कर देणार?