Amol Mitkari On Ajit Pawar Death:महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात (Ajit Pawar Plane Crash) दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांचे लिअरजेट विमान कमी दृश्यमानता आणि धुक्यामुळे नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले, ज्यात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. 

Continues below advertisement

सध्या अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू असून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही नेत्यांनी या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर या अपघातानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच, आता या प्रकरणाशी 'काळी जादू' (Black Magic) आणि 'अघोरी पूजा' यांचा संबंध असल्याचा खळबळजनक आरोपही वारंवार करण्यात येत आहे. याचदरम्यान आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी एक्सवर पोस्ट करत धक्कादायक माहिती दिली आहे. (Ajit Pawar Plane Crash) 

अमोल मिटकरी काय म्हणाले? (Amol Mitkari On Ajit Pawar Death)

काल रात्री अजितदादांच्या प्रतिमेला काही लोक दिवा बत्ती करण्यासाठी गेले असता, त्यांना गोजुबावी या ठिकाणी पूजेच्या ताटात 2 लिंब टाचण्या टोचून ठेवलेल्या स्थितीत आढळल्या, हे कुणी जाणीवपूर्वक करतेय की अघोरी पुजा प्रकार?, असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. 

Continues below advertisement

अमोल मिटकरी आणि रोहित पवारांनी याआधीही केला होता अघोरी प्रकाराचा दावा- (Ajit Pawar Death Case)

अजित पवार यांच्या अपघाताच्या एक दिवस आधी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या बांधकाम साइटवर 'अघोरी पूजा' करण्यात आली होती, असा दावा अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे. या संपूर्ण घटनेमागे काहीतरी अघोरी प्रकार किंवा कट असल्याचा संशय शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बारामती विमान दुर्घटनेचा ब्लॅकबॉक्स अद्याप बारामती पोलीस ठाण्यात- अमोल मिटकरी (Ajit Pawar Death Case)

अजित पवार यांचे विमानात बसण्यापूर्वीचे सीसीटीव्ही अद्याप बाहेर का आले नाहीत. तुम्ही म्हणाला 15 दिवसांत ब्लैक बॉक्स डेटा बाहेर आणू, मग 4 महिने झाले का डेटा बाहेर आला नाही. अशोक खरातचे सीसीटीव्ही गतीने बाहेर येतात, परतवाडा प्रकरणातील सीसीटीव्ही बाहेर येतात मग अजित पवार अपघाताचे का नाहीत?, बारामती विमान दुर्घटनेचा ब्लॅकबॉक्स अद्याप बारामती पोलीस ठाण्यात आहे. बारामतीत मी मागील 3 दिवस फिरत आहे. बारामतीचे लोक आम्हाला सांगत आहेत, असं अमोल मिटकरी एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Amol Mitkari on Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या अपघाताआधी अघोरी प्रकार; सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठानमध्ये जाण्याआधी तिथंही पूजा, बोकड उलटं टांगलं अन्....; अमोल मिटकरींच्या पोस्टने खळबळ