Ameesha Patel : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. अमिषाच्या चित्रपटांना तिच्या चाहत्यांची पसंती मिळते. गदर, कहो ना प्यार है आणि भूल भूलैया या चित्रपटामधून अमिषा प्रेक्षकांच्या भेटीस आली. काही दिवसांपूर्वी अमिषानं धर्मवीर या चित्रपटाच्या ट्रेलरला हजेरी लावली होती. या ट्रेलर लाँच वेळी अमिषानं उपस्थित असलेल्या मान्यवरांची भेट घेतली. ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील हजेरी लावली होती. संजय राऊत यांना पाहताच अमिषानं त्यांना जादूची झप्पी दिली. 

Continues below advertisement


अमिषानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती अमिषासोबतच संजय राऊत देखील दिसत आहे. या व्हिडीओला अमिषानं कॅप्शन दिलं, 'मुंबईमध्ये धर्मवीर या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली. या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा' व्हिडीओ शेअर करून अमिषानं संजय राऊत यांना कॅप्शनमध्ये टॅग देखील केलं. 


पाहा व्हिडीओ-



 






मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. तसेच रितेश देशमुख आणि सलमान खान या सेलिब्रिटींनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. धर्मवीर या चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओकनं प्रमुख भूमिका साकारली आहे. झी स्टुडिओज आणि मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सनं धर्मवीर चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रविण तरडेनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.  13 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


हेही वाचा :