Aly-Jasmin Break Up : ‘बिग बॉस 14’ फेम अभिनेत्री जास्मिन भसीन (Jasmin Bhasin), अली गोनीसोबतच्या (Aly Goni) ब्रेकअपमुळे सध्या चर्चेत आहे. वास्तविक, एका फोटोमुळे लोकांनी असा अंदाज लावला आहे की, आता त्यांचे ब्रेकअप झाले आहे. यासोबतच दुबईत राहणाऱ्या एका खास व्यक्तीवर जास्मिन भाळली असल्याचे बोलले जात आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने जास्मिन भसीनची जवळची मैत्रीण पूर्वा राणा हिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो समोर आल्यापासून जास्मिन भसीन आणि अली गोनी यांच्या ब्रेकअपची चर्चा सर्वत्र होत आहे.


जास्मिनच्या मैत्रिणीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीसोबत एक चिंपांझी दिसला होता. अर्थात ही पोस्ट केवळ एक गंमत होती. दरम्यान, आता जास्मिन भसीनने सोशल मीडियावर एक विचित्र पोस्ट शेअर केली आहे.


जास्मिन भसीन का झाली दु:खी?


जास्मिन भसीनने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एका पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'जेव्हा तुम्ही लोकांशी तसेचं वागता, जे तुमच्याशी तसे वागतात. तेव्हा ते नाराज होतात.’ जास्मिन भसीनने ही पोस्ट का शेअर केली? आता हे फक्त तीच सांगू शकते. पण, ‘जसली’च्या चाहत्यांसाठी हे सगळं पाहणं खूप अवघड आहे.




जास्मिन भसीन आणि अली गोनी यांनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकमेकांसोबत कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. प्रत्येक प्रसंगी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या अली गोनी आणि जास्मिन भसीन यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्तानेही कोणतीही खास पोस्ट शेअर केली नाही.


जास्मिन भसीन आणि अली गोनी बऱ्याच काळापासून एकत्र आहेत. सलमान खानच्या ‘बिग बॉस 14’ या रिअॅलिटी शोदरम्यान दोघांनीही आपण एकमेकांना पसंत असल्याची कबुली दिली होती. यादरम्यान फॅमिली वीकमध्ये पोहोचलेल्या जस्मिन भसीनच्या कुटुंबीयांनी अली गोनीसोबतच्या तिच्या नात्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शो संपल्यानंतरही दोघे एकत्र होते आणि जास्मिन भसीनही अली गोनीच्या कुटुंबासोबत चांगलीच जुळवून घेत होती. मात्र, आता यांच्या नात्यात खरंच काही बिनसलंय का, हे दोघेच सांगू शकतील.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha