Allu Arjun Arrest : पुष्पा-2 अभिनेता अल्लू अर्जुनची आज (14 डिसेंबर) सकाळी 6.30 च्या सुमारास चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. त्याला घेण्यासाठी त्याचे वडील अल्लू अरविंद आणि सासरे कंचराला चंद्रशेखर रेड्डी तुरुंगात पोहोचले होते. अल्लू तब्बल 18 तास कोठडीत होता. रिलीजनंतर अल्लू गीता आर्ट्स प्रॉडक्शन हाऊसमध्ये पोहोचला. यानंतर अल्लू अर्जुन नऊ वाजण्याच्या सुमारास हैदराबाद येथील त्याच्या घरी पोहोचला. अलु अर्जुन म्हणाला की, प्रेम आणि समर्थनासाठी मी सर्व चाहत्यांचे आभार मानतो. काळजी करण्यासारखे काही नाही. मी ठीक आहे! मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. मी पुन्हा एकदा पीडित कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. ही एक दुर्दैवी घटना होती. जे घडले त्याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. 


अल्लू-अर्जुन जगभरात लाखो चाहते आहेत. पुष्पा पडद्यावर झुकला नाही, पण खऱ्या आयुष्यात त्याला कायद्यापुढे झुकावं लागलं आहे. आता सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे की, असे काय झाले की सुपरस्टार अल्लू अर्जुनला पोलिसांनी त्याच्या बेडरूममधून नेले.


जेव्हा अल्लू अर्जुन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे नाव विसरला


अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर भूवया उंचावल्या आहेत. जेव्हा त्याच्या अटकेची बातमी आली तेव्हा अल्लू अर्जुनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ पुष्पाला मिळालेल्या यशाचा होता. पुष्पा चित्रपटाच्या या  मेळाव्याचे आयोजन 5 दिवसांपूर्वी करण्यात आले होते. यावेळी अल्लू अर्जुन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे नाव विसरला होता.


चित्रपट उद्योग अजूनही केसीआर यांच्या प्रभावात!


तेलंगणात सत्ता बदलली असली तरी तेलुगू चित्रपट उद्योगातील सर्वात मोठी हिस्सेदारी रेवंत रेड्डी यांच्याऐवजी केसीआर यांच्या हातात आहे. बहुतांश सेलिब्रिटी केसीआर यांचे मित्र आहेत. 2014 पर्यंत चित्रपट उद्योग चंद्राबाबू नायडू यांच्या हातात होता. आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर 2014 मध्ये BRS सत्तेवर आल्यानंतर पहिल्या वर्षात चित्रपट उद्योगाचे राज्य सरकारशी चांगले संबंध नव्हते. पण एका वर्षानंतर अनेक चित्रपट कलाकार आणि निर्माते तत्कालीन सीएम केसीआर यांचा मुलगा केटीआर यांच्या जवळ आले आणि हा ट्रेंड 2024 पर्यंत कायम राहिला.


सेलिब्रेटींचा अजूनही केटीआर यांना पाठिंबा


रेवंत रेड्डी मुख्यमंत्री झाल्यानंतरही बहुतांश लोक अजूनही केटीआरला पाठिंबा देत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेता नागार्जुनचे एन कन्व्हेन्शन जमिनदोस्त करण्यात आले. 3 महिन्यांपूर्वी तलावावर कब्जा करून ते बांधले असल्याचा आरोप केला गेला. काँग्रेस सरकारमधील मंत्री के सुरेखा यांनी समंथा आणि केसीआर यांच्याविरोधात टिप्पणी केली आहे. भाजप नेते टी राजा यांनीही अल्लू अर्जुनची अटक चुकीची असल्याचे म्हटले आहे.


काय म्हणाले रेवंत रेड्डी?


तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही अल्लू अर्जुनच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली. एका टीव्ही चॅनलशी बोलताना ते म्हणाले की, या देशात संविधान सामान्य माणूस आणि पंतप्रधानांसाठी समान आहे. संविधानाने सर्व लोकांसाठी समान कायदे आणि नियमांची तरतूद केली आहे.
पुष्पा 2 रिलीजच्या पहिल्या दिवशी आम्ही 300 रुपयांना तिकिटे विकण्याची परवानगी दिली होती. त्याचा फायदा शो झाला आणि 1300 रुपयांना तिकिटे विकली गेली. तेथे कोणतीही व्यवस्था नव्हती. एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. त्यांचा मुलगा रुग्णालयात आहे. जर कोणावर गुन्हा दाखल झाला नाही तर सिने कलाकारांसाठी नवीन घटना बनवली गेली आहे आणि सामान्य माणूस असता तर त्यांना एका दिवसात तुरुंगात टाकले असते असे म्हटले जाईल. या गुन्ह्याला जबाबदार असलेल्यांचा शोध घेणे आपल्या सरकारसाठी महत्त्वाचे आहे.


4 डिसेंबरला काय घडले?


हैदराबादच्या संध्या थिएटरमधून हा घटनाक्रम सुरु झाला. अल्लू अर्जुनचा सुपर-डुपर चित्रपट पुष्प-2 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 4 डिसेंबरला पुष्पा-2 च्या स्क्रिनिंगवेळी थिएटर खचाखच भरले होते. आत जागा कमी आणि बाहेर चाहत्यांची गर्दी होती. अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी लोक वेडे झाले होते. चेंगराचेंगरीनंतर हैदराबाद पोलीस कारवाईत आले, एफआयआर दाखल करण्यात आला आणि 9 दिवसांनंतर अखेर त्याला अटक करण्यात आली. अल्लू अर्जुनला त्याच्या बेडरूममधून अटक करण्यात आली. अल्लू अर्जुन अरेस्ट हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. 


इतर महत्वाच्या बातम्या