Allu Arjun Arrest : पुष्पा 2 चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधी 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या थिएटरबाहेर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एका 35 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला. याशिवाय त्यांचा 8 वर्षाचा मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एफआयआरनंतर अल्लू अर्जुनला आता अटक करण्यात आली आहे.
पुष्पा आणि पुष्पा 2 या दोन्ही चित्रपटांमध्ये इन्स्पेक्टर शेखावतशी पुष्पाचे खास वैर दाखवण्यात आले होते. अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर मीम्सचा सुद्धा पाऊस पडला आहे. अल्लू अर्जुनच्या अटकेवर पुष्पाचे चाहते शोक व्यक्त करत आहेत. तेच मेमर्स पुष्पा-2 शी लिंक करून फनी मीम्स बनवत आहेत. इन्स्पेक्टर शेखावतचा फोटो पोस्ट करताना @GaurangBhardwa1 ने त्यावर कॅप्शन लिहिले आहे. फोटोवर लिहिले आहे की, पुष्पाने कितीही गुंडगिरी केली तरी शेवटी भारतीय पोलिसांचाच विजय होईल.
इन्स्पेक्टर शेखावत यांचा फोटो पोस्ट करताना @GaurangBhardwa1 ने त्यावर कॅप्शन लिहिले आहे. फोटोवर लिहिले आहे की, पुष्पाने कितीही गुंडगिरी केली तरी शेवटी भारतीय पोलिसांचाच विजय होईल.
अल्लू अर्जुनच्या अटकेमुळे संतापलेल्या एका चाहत्याने हा मीम पोस्ट केला आहे. ज्यामध्ये एका बाजूला अल्लू अर्जुनच्या चित्रपटातील एका दृश्याचे चित्र आहे. दुसरीकडे, पुष्पाच्या चाहत्यांनी त्यांच्या स्टारला अटक झाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पुष्पा चित्रपटातील दृश्याचा फोटो पोस्ट करत @ayush95_ लिहिले - घे भाऊ पुष्पा भाऊ पण गेले.
पुष्पा फ्रँचायझीमध्ये पुष्पा आणि इन्स्पेक्टर शेखावत यांच्यातील वैर दाखवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनच्या अटकेवर या मीममध्ये शेखावतचे पात्र आनंदी दाखवण्यात आले आहे. या पोस्टमध्ये @_TKtwt_ नावाच्या युजरने लिहिले - मला असे वाटते की पुष्पाची अटक शेखावत यांचे षड्यंत्र आहे.
अल्लू अर्जुनच्या अटकेविरोधात यूजर्सही विरोध करताना दिसत आहेत. अनेक यूजर्सनी #AlluArjunArrest हॅशटॅगवर पोस्ट लिहून अल्लू अर्जुनला सपोर्टही केला आहे.
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 च्या स्क्रिनिंगदरम्यान चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. त्याला चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या