Allu Arjun On Pushpa 2 Record: तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) च्या 'पुष्पा 2: द रूल'नं बॉक्स ऑफिसवर धमाका उडवून दिला आहे. एन्टरटेन्मेटचा फुल्ल ऑन डोस पुष्पा 2 देत आहे. बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाईसह अनेक नवे विक्रमही पुष्पानं रचले आहेत. पण असं सर्व असूनही, सुपरस्टार अल्लू अर्जुन म्हणतोय की, आशा आहे की, लवकरच 'पुष्पा 2: द रूल'चे सर्व रेकॉर्ड मोडणारा नवाकोरा चित्रपट येईल आणि सर्वच्या सर्व रेकॉर्ड धुळीत मिळतील. 

Continues below advertisement

गुरुवारी दिल्लीत माध्यमांशी बोलताना अल्लू अर्जुन म्हणाला की, त्याच्या 'पुष्पा 2'च्या रिलीजचं प्रचंड यश म्हणजे, लोकांच्या प्रेमाचं प्रतिबिंब आहे आणि त्याला आशा आहे की, या ॲक्शन थ्रिलरचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बनला आहे, जो सर्वात जलद जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 

अल्लू अर्जुनला मोडायचेत 'पुष्पा 2'चे सर्व रेकॉर्ड्स

दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना अल्लू अर्जुन पुढे म्हणाला की, "1000 कोटींचा आकडा हा लोकांच्या प्रेमाचं प्रतिबिंब आहे. हा आकडा तात्पुरता आहे, परंतु तुमच्या अंतःकरणातील प्रेम कायम राहील. माझा विश्वास आहे की, आकडे नेहमीच खंडित केले पाहिजेत. होय, या ठिकाणी राहणं आणि रेकॉर्डचा आनंद घेणं चांगले आहे, कदाचित 2-3 महिने. 

Continues below advertisement

अल्लू अर्जुन पुढे बोलताना म्हणाला की, "हा कोणता चित्रपट आहे, तेलुगु, तमिल, हिंदी किंवा आणखी कोणता... पण, मला असं वाटतं की, हे सर्व रेकॉर्ड लवकरच मोडीत निघावे कारण हेच  प्रोग्रेसन आहे. याचाच अर्थ असा की, भारत पुढे जातोय. मला असं वाटतंय की, हे आकडे लवकरात लवकर मोडीत निघावेत, कारण हीच ग्रोथ आहे आणि मला ग्रोथ आवडते."

'पुष्पा 2'ची जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई 

दरम्यान, 'पुष्पा 2: द रुल', अर्जुनच्या 2021 च्या तेलुगु ब्लॉकबस्टर पुष्पा: द राइजचा सिक्वेल आहे. 5 डिसेंबर रोजी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळममध्ये हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट 2024 मधील सर्वात हिट चित्रपट बनला आहे आणि अनेक विक्रम मोडले आहेत. बॉक्स ऑफिसवर, या चित्रपटानं सर्वात आधी 294 कोटींचा ओपनिंग नंबर नोंदवला आणि नंतर अवघ्या सहा दिवसांत 1000 कोटी क्लबमध्ये सामील होऊन इतिहास रचला आहे.