Allu Arjun Net Worth: साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun ) सध्या त्याच्या आगामी 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 'पुष्पा : द राइज'चा (Pusha part 1) सिक्वेल आहे. अल्लू अर्जुनला या सिनेमामुळे तुफान प्रसिद्धी मिळाली.  पण तुम्हाला माहीत आहे का की, बऱ्याचदा त्याच्या लुक्समुळेच अल्लू अर्जुनला चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत. 


अल्लू अर्जुनने 2003 मध्ये आलेल्या 'गंगोत्री' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. मात्र, असे असूनही त्याला चांगल्या भूमिकांसाठी संघर्ष करावा लागला. अल्लू अर्जुनने स्वत: त्याच्या 'आर्य' या ब्लॉकबस्टर चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हैदराबादमधील एका कार्यक्रमात याचा खुलासा केला होता.


वाईट लूक्समुळे मिळल्या नाहीत चांगल्या भूमिका?


अभिनेत्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं की, 'गंगोत्री हिट झाला, पण मी दिसायला चांगला नसल्याने मला चांगले चित्रपट मिळाले नाहीत. हा चित्रपट ब्लॉकबस्टर असला तरी, मला असे वाटले की मी अभिनेता म्हणून अपयशी ठरलो आणि 0 वरून मायनस 100 वर गेलो. पण दिग्दर्शक सुकुमार यांच्यामुळेच त्याचे नशीब बदलले, ज्यांच्यामुळे त्याला 'आर्य' सारख्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.


अल्लू अर्जुन एका सिनेमासाठी घेतो कोट्यवधींचं मानधन


आज अल्लू अर्जुन कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. तो त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी कोट्यवधींचं मानधन घेतो. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुन त्याच्या एका सिनेमासाठी 65-100 कोटी रुपये घेतो. पण अल्लू अर्जुनने 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटासाठी 300 कोटी रुपयांचं मानधन घेतलं असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे सध्याच्या स्थितीला भारतातील सर्वात महागडा अभिनेता आहे. नेट वर्थबद्दल बोलायचे झाल्यास, अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुन 460 कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीचा मालक आहे. 


पुष्पा 2: द रूल कधी रिलीज होणार? 


अल्लू अर्जुनचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' यावर्षी 5 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सुकुमारन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात फहद फासिल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.


ही बातमी वाचा : 


Paaru Marathi Serial : किर्लोस्करांच्या होणाऱ्या सुनेमुळे नवं वादळ येणार, बहिणीच्या अपमानाचा बदला अनुष्का घेणार