AA22xA6 Is Now Raaka: फिल्म इंडस्ट्रीचा (South Film Industry) सर्वात मोठा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun), त्याचा नवा अॅक्शन पॅक सिनेमासह मोठी धमाल करण्यासाठी सज्ज झालाय. या सिनेमात तो 'ॲटली'सोबत काम करणार आहे, तर यावेळी त्याच्यासोबत लेडी सुपरस्टार दीपिका पादुकोण (Deepika Padukone) स्क्रिन शेअर करणार आहे. अल्लू अर्जुन स्टार हा सिनेमा जबरदस्त ब्लॉकबस्टर ठरेल यात काही शंकाच नाही. बरं याचा पुरावा, 'राका'चं (RAAKA) पोस्टर पाहून मिळतोय. 

साऊथ सुपरस्टार Allu Arjun यांच्या 44 व्या वाढदिवसानिमित्त आता या आगामी सिनेमाला 'राका' हे नाव मिळालं आहे. तर अभिनेत्याचा फर्स्ट लूकही रिलीज केलाय. अल्लू अर्जुनचा हा लूक जबरदस्त आणि अतिशय इंटेन्स दिसतोय.

सन पिक्चर्सच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिलंय की, "AA22xA6 आता RAAKA आहे. स्वतःला अशा एका जगासाठी तयार करा जे सर्व सीमांपलीकडे आहे..." ही पोस्ट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतेय. अल्लू अर्जुनचा लूक रिलीज केल्यानंतर काही मिनिटांतच या पोस्टला 2.52 लाखांहून अधिक लाईक्स आणि 8,000 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत. 

अल्लूचा डेडली लूक

'राका'च्या टायटल पोस्टरमध्ये अल्लू अर्जुनचा क्लोज-अप लूक दाखवण्यात आलाय. डोक्यावर अर्धवट दिसणारे केस, मोठी टोकदार नखं आणि प्राण्यासारख्या पंजांनी झाकलेला अर्धा चेहरा, त्यातून घाबरवणाऱ्या काळ्या डोळ्यांसह दाट मिशा, असा त्याचा लूक आहे. विशेषतः त्यांची तीक्ष्ण नजर आणि डोक्यावरचं टक्कल त्यांच्या पात्राला अधिक गूढ आणि दमदार बनवतंय.                     

अल्लू अर्जुन 'राका'मधून 'पुष्पा'ला विसरायला भाग पाडणार?

अल्लू अर्जुनचा नव्या सिनेमातला लूक 'राका' सध्या जोरदार चर्चेत आहे. अशातच वर्षभरापूर्वी आलेल्या सिनेमात 'पुष्पा' साकारुन अल्लू अर्जुननं सर्वांना वेड लावलेलं. अजूनही प्रेक्षकांच्या मनावरची 'पुष्पा'ची छाप पुसलेली नाही, अशातच आता 'राका' साकारून अल्लू अर्जुन प्रेक्षकांच्या मनावर पुन्हा एकदा छाप पाडण्यासाठी सज्ज झालाय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Scam 1992 Breaks Ramayans Record: सत्य घटनेवर आधारित 'या' सीरिजनं मोडला 'रामायण'चा रेकॉर्ड; फक्त 5 एपिसोड पण, शेवटपर्यंत पापणीही पडू देत नाही, IMDb वर 9.2 ची रेटिंग