Scam 1992 Breaks Ramayans Record: टेलिव्हिजनवरचा (Television Serial) सर्वात लोकप्रिय शो कोणता? तर चटकन कोणीही डोळे झाकून उत्तर देईल, 'रामायण' (Ramayana) आणि 'महाभारत' (Mahabharat) ही दोन नावं हमखास घेतली जातात. 80-90 च्या दशकात 'रामायण' हा सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी (TV Serial) एक होता. टीव्हीवर 'रामायण' लागायची वेळ झाली की, रस्ते सुनसान व्हायचे, अगदी चिटपाखरूही दिसायचं नाही. सर्वजण टीव्हीसमोर बसून 'रामायण' पाहायचे. पण, तुम्हाला माहितीय का? एका सीरिजनं 'रामायण'चा हा रेकॉर्ड मोडीत काढलाय. आम्ही आज ज्या सीरिजबाबत सांगणार आहोत, त्या सीरिजनं रेटिंगच्या बाबतीत 'रामायण'लाही मागे टाकलंय. IMDb वर'रामायण'ची रेटिंग 9.0 आहे, तर या सीरिजची रेटिंग 9.2 आहे. 

Continues below advertisement

'स्कॅम 1992' (Scam 1992: The Harshad Mehta Story)

'रामायण'लाही मागे टाकणाऱ्या सीरिजचं नाव आहे, 'स्कॅम 1992'. ही सीरिज 9 ऑक्टोबर 2020 रोजी SonyLIV वर प्रदर्शित झाली होती. ही सीरिज देशातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यावर आधारित आहे. या सीरिजमध्ये 'बिग बुल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षद मेहता (Harshad Mehta) यांच्या जीवनाची कथा दाखवण्यात आली आहे. अगदी सर्वसामान्य कुटुंबातल्या हर्षद मेहता यांनी 1992 मध्ये त्या काळातील सर्वात मोठा स्कॅम केलेला. या सीरिजमध्ये हर्षद मेहता यांच्या उदय आणि पतनाची कहाणी मांडली आहे, एक असा स्टॉक ब्रोकर, ज्यानं एकट्याच्या बळावर शेअर बाजाराला नव्या उंचीवर नेलं.

बाजारातील मोठ्या खेळाडूंना हर्षद मेहता यांच्यामुळे धोका वाटू लागला, कारण हर्षद मेहता यांच्यासोबतच्या त्यांच्या व्यवहारांमुळे त्यांचा व्यवसाय प्रभावित होऊ लागला. त्यामुळे ते परदेशी बँकांशी हातमिळवणी करतात, ज्या आधी हर्षदसोबत व्यवहार करण्यास तयार नव्हत्या, आणि त्यांच्या मोठ्या आर्थिक व्यवहारांचा पर्दाफाश करण्याचा कट रचतात. दरम्यान, देशाची मध्यवर्ती बँक असलेली रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) चे गव्हर्नरही हर्षद इतक्या मोठ्या व्यवहारांसाठी पैसा कसा उभा करतो, हे जाणून घेण्यास उत्सुक असतात. विविध स्रोतांमधून ही माहिती पत्रकार सुचेता दलाल (Sucheta Dalal) यांच्यापर्यंत पोहोचते आणि त्यानंतर संपूर्ण घोटाळा उघडकीस येतो.

Continues below advertisement

प्रतिक गांधीच्या अभिनयावर कौतुकाचा वर्षाव (Harshad Mehta Lead In Scam 1992)

'स्कॅम 1992' सीरिजचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलंय आणि जय मेहता जय मेहता सह-दिग्दर्शक होते. सीरिजमध्ये प्रतिक गांधी यांनी हर्षद मेहता यांची भूमिका साकारलीय. या सीरिजमध्ये प्रतिक गांधीनं साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. याव्यतिरिक्त या सीरिजमध्ये श्रेया धनवंतरी, हेमंत खेर, अंजलि बारोट, निखिल द्विवेदी आणि सतीश कौशिक यांसारखे कलाकारही झळकलेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Superstar Who Delivered Four Hits In Year: एकाच वर्षांत 4 सुपरहिट फिल्म्स देणारा सुपरस्टार; बॉक्स ऑफिसही याच्यासमोर थरथर कापलं, पुढे बनला सुपरहिट फिल्म्सची गॅरेंटी, ओळखलं का कोण?