Iran America War Pakistan: पाकिस्तानने इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबवून पाकिस्तानने जगामध्ये शांततेचा संदेश दिला आहे. हे श्रेय आमच्या महाविश्वगुरुंना का मिळालं नाही? कारण महाविश्वगुरुंना कोणतीच भूमिकाच नाही. तिकडे जगात युद्ध सुरु (Iran America War) आहे आणि आमचे महाविश्वगुरु पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, येथे आपल्या राजकीय विरोधकांवर तोंडातून बॉम्ब टाकत होते, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. इराण-अमेरिका युद्ध थांबल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी फोन करुन पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचे आभार मानले. डोनाल्ड ट्रम्प हे आपले शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानला थँक क्यू म्हणत असतील तर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Iran America War latest updates)
जगात युद्ध सुरु असताना आपल्या महाविश्वगुरुंनी कोणतीच भूमिका घेतली नाही. ते राजकीय विरोधकांवर तोंडातून शाब्दिक बॉम्ब टाकत होते. यांची हत्यारं काय तर निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय (Supreme Court), देशाचे उपराष्ट्रपती. याच्या माध्यमातून लोकशाहीचा विध्वंस करण्याचे काम आमचे महाविश्वगुरु करत होते. तिकडे जागतिक युद्ध थांबवण्याचे श्रेय चीन आणि पाकिस्तानने घेतले, असे संजय राऊत यांनी म्हटले.
आता शांती बैठक इस्लामाबादला होणार आहे, जे ऑपरेशन सिंदूरमध्ये तुम्ही ताब्यात घेणार होता. तिकडेच बसून नेत्यानाहू, ट्रम्प आणि इराणी नेते जागतिक शांततेवर चर्चा करणार आहेत. भारतासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हे कसले विश्वगुरु, पाकिस्तानला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळाली, त्यासाठी मोदी आणि त्यांचे सरकार जबाबदार आहे. पाकिस्तानने खऱ्या अर्थाने युद्ध थांबवले. मोदी यांचे समर्थक रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाले तेव्हा 'वॉर रुकवा दी पापा' म्हणत होते, पण ते युद्ध अजूनही सुरु आहे, अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली.
आणखी वाचा
