मुंबई : साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अल्लू अर्जुनने आपल्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अल्लू अर्जुनने 'पुष्पा' या आपल्या आगामी चित्रपटाची अनाऊंसमेन्ट केली आहे. हा चित्रपट हिंदीमध्येही रिलीज करण्यात येणार आहे.

Continues below advertisement


या चित्रपटाबाबत अद्याप काही माहिती आलेली नाही. परंतु, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात रश्मिका मंदना समोर येणार आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार करणार आहेत. याआधी अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक सुकुमार यांनी याआधी आर्य आणि आर्य 2 यांसारख्या सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत.



अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये अल्लू अर्जुन रागामध्ये उभा असलेला दिसत असून त्याला जखमही झाली आहे. फॅन्सना अल्लूचा हा लूक फार आवडला आहे.

काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनने फिल्म इंडस्ट्रिमधील आपली 17 वर्ष पूर्ण केली आहेत. इंडस्ट्रिमध्ये तुम्ही एवढ्या वेळापासून चाहत्यांनी जे प्रेम दिलं त्यासाठी चाहत्यांचे आभारही मानले होते. त्यासाठी त्याने लिहिलं होतं की, 'मी आपले फॅन्स आणि सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो. ज्यांनी एवढी वर्ष मला प्रेम दिलं. खासकरून मी रागवेंद्र गारू, अश्विनी दत्त गारू यांचे आभार मानणार आहे.'


संबंधित बातम्या : 


अभिनेता पूरब कोहलीसह संपूर्ण परिवार कोरोनामुक्त, 'हे' घरगुती उपाय फायद्याचे ठरले, पूरबची इन्स्टा पोस्ट


Coronavirus | भाईजानची गरजूंना मदत; इंडस्ट्रिमधील 16000 मजूरांच्या खात्यात 4 कोटी 80 लाख रूपये


Coronavirus | बॉलिवूड निर्माता करीम मोरानीच्या दुसऱ्या मुलीलाही कोरोनाची लागण!