All Of Us Are Dead Jombie Thriller on Netflix: ‘ऑल ऑफ अस आर डेड’ (All of Us Are Dead) ही नवीन कोरियन वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झाली आहे. प्रेक्षक या झॉम्बी थ्रिलर सिरीजची ‘स्क्विड गेम’शी तुलना करत आहेत. अनेक प्रेक्षक या कोरियन वेब सिरीजला ‘न्यू स्क्विड गेम्स’ म्हणत आहेत. ‘ऑल ऑफ अस आर डेड’ आणि ‘स्क्विड गेम’ची (Squid Game) संकल्पना सारखीच आहे. दोन्हीच्या कथांमध्ये मृत्यूचा तांडव आणि आपल्याच लोकांकडून जीवाचा धोका आहे.


'ऑल ऑफ अस आर डेड' ही झॉम्बी हल्ल्याची कथा आहे. या सिरीजमध्ये, हायस्कूल हा झॉम्बींचा अड्डा बनतो. शाळेतील विद्यार्थी कठीण परिस्थितीत अडकतात. विद्यार्थ्यांना स्वतःचा जीव तर वाचवावा लागतोच, पण शाळेलाही या संकटातून बाहेर काढावे लागते. ‘ऑल ऑफ अस आर डेड’मध्ये त्यांच्या स्वत:च्या मित्रांसोबतच्या जीवनाच्या लढाईची कहाणी अतिशय मनोरंजक आणि साहसांनी भरलेली आहे.


काय आहे कथानक?


'ऑल ऑफ अस आर डेड' ही कथा शालेय विद्यार्थ्यांच्या एका सामान्य दिवसाची आहे. सर्व विद्यार्थी शाळेत पोहोचतात, तिथे विज्ञानाचे प्रात्यक्षिक होत असते. हे विज्ञानाचे प्रात्यक्षिक अपयशी ठरते, ज्यामुळे एका मुलीला संसर्ग होतो आणि ती झॉम्बी बनते. त्यानंतर हा विषाणू पसरण्यास सुरुवात होते. ‘ऑल ऑफ अस आर डेड’ची कथा खूपच मनोरंजक आहे.



‘स्क्विड गेम’ फेम अभिनेता मुख्य भूमिकेत!


या नवीन कोरियन वेब सिरीजमध्ये (New Korean Web Series) ‘स्क्विड गेम’ फेम अभिनेता अभिनेता ली यू-मी मुख्य भूमिकेत दिसत आहे. तसेच, युन चॅन यंग, ​​पार्क जी हू, चो यी ह्यून, पार्क सोलोमन आणि यू इन सू देखील मुख्य भूमिकेत झळकले आहेत. आजकाल कोरियन वेब सिरीजची प्रेक्षकांमध्ये क्रेझ आहे. ‘स्किड गेम’नंतर, 'ऑल ऑफ अस आर डेड' सिरीज देखील सुपरहिट डुपर हिट होण्याची शक्यता आहे. Squid Gameने Netflix ला करोडोंचा नफा मिळवून दिला होता. आता ‘ऑल ऑफ अस आर डेड’ही नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha