Kangana Ranaut , Alia Bhatt : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा (Alia Bhatt) गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)  हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut ) गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाबद्दलचं मतं मांडून आलिया भटवर निशाणा साधला होता. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये कंगना ही आलियाला 'बिंबो' आणि 'पापा की परी' असं म्हणाली.  आलियानं कोलकाता येथे चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कंगनाला सडोतोड उत्तर दिलं.  ती म्हणाली, 'भगवान श्रीकृष्णानं गीतेमध्ये सांगितलं आहे की, काही वेळेला काहीच रिअॅक्शन न देणं योग्य ठरतं'.


कंगनानं सोशल मीडियावरील पोस्टवर लिहिले होते, 'संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील कास्टिंग चुकीचे आहे. येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपये राख होणार आहेत' पुढे तिनं लिहिले, 'चित्रपटामध्ये आलियाची कास्टिंग चुकीची झाली आहे. हे लोक कधीच सुधारणार नाही.  हे लोक मुव्ही माफिया आहेत.'






 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन  संजय लीला भन्साळी यांनी केले आहे.  आलियासोबत  शांतनु महेश्वरी आणि अजय देवगण हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.   


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha