Alia Ranbir Wedding : अभिनेता  रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt)  हे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा आहे. रिपोर्टनुसार, 14 एप्रिल रोजी हे दोघे विवाह बंधनात अडकणार होते. पण आता आलियाच्या भावानं म्हणजेच राहुल भटनं (Rahul Bhatt) एका मुलाखतीमध्ये लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे, असं सांगितलं आहे. 

Continues below advertisement

मुलाखतीमध्ये राहुल भटनं सांगितलं, '14 एप्रिल दरम्यान आलिया आणि रणबीर लग्नबंधनात अडकणार नाहित. लग्नाची तारीख लिक झाल्यामुळे ती पुढे ढकलण्याचा निर्णय आलिया आणि रणबीरनं घेतला आहे.' आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा हा 14 एप्रिल रोजीच पार पडणार होता असंही राहुलनं मुलाखतीमध्ये सांगितलं. 

राहुल पुढे म्हणाला की, 'लाग्नाच्या काही दिवस आधी आलिया आणि रणबीर त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करतील.' तसेच 20 एप्रिलच्या जवळपास त्यांचा लग्नसोहळा पार पडेल, असंही संकेत राहुलनं मुलाखतीमध्ये दिले.  

Continues below advertisement

आलिया- रणबीरच्या लग्नामध्ये 200 बाउन्सर: राहुल भट

एका मुलाखतीमध्ये आलियाच्या भावाने म्हणजेच राहुल भटने (Rahul Bhatt) लग्नामध्ये असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल माहिती दिली होती. मुलाखतीमध्ये राहुल भट यानं सांगितलं आहे की, 'आलिया आणि रणबीरच्या लग्नाची जबाबदारी युसूफ भाई हे पार पाडणार आहेत. मुंबईमधील  '9/11' या सुरक्षा व्यवस्थेची एजन्सी ही त्यांचीच आहे. या एजन्सीमधील 200 बाउन्सर लग्नामध्ये सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पार पाडणार आहेत. 'आरके’ स्टुडिओ परिसरात गार्ड्स तैनात असतील', अशीही माहिती राहुलनं दिली होती.

हेही वाचा :