Farah Khan On Akshaye Khanna Dhurandhar Movie: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) 'धुरंधर' (Dhurandhar Movie) सिनेमा चांगलाच गाजतोय. यामध्ये लीड रोलमध्ये बॉलिवूडचा (Bollywood News) एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) दिसलाय. पण, त्याच्यापेक्षाही जास्त चर्चा होतेय ती, अक्षय खन्नाची (Akshaye Khanna). या सिनेमानं बॉक्स ऑफिस आपल्या ताब्यात घेतलं आहे. सर्वच स्टारकास्ट जबरदस्त दिसलीय. 'धुरंधर' पाहताना अक्षय खन्नावरुन नजर हटवणं जवळपास अशक्यच. अक्षय खन्नानं 'रहमान डकैत'च्या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिलाय. जरी रणवीर लीड रोलमध्ये असला तरीसुद्धा अक्षय खन्नाचा कोल टॉप-नॉच आहे. आता अक्षय खन्नाच्या या भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्कार (Oscar Awards) देण्यात यावा अशी मागणी केली जातेय. बरं ही मागणी अक्षय खन्नाच्या कोणत्याही चाहत्यानं केलेली नाही, तर बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध कोरिओग्राफरनं (Choreographer) ही मागणी केलेली आहे.
'धुरंधर' (Dhurandhar) या मल्टिस्टारर सिनेमात अक्षय खन्नानं साकारेल्या 'रहमान डकैत'च्या भूमिकेचं सर्वांकडून कौतुक केलं जातंय. अशातच बॉलिवूडची प्रसिद्ध निर्माती आणि कोरिओग्राफर फराह खानला देखील अक्षय खन्नानं आपल्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पाडलंय.
फराह खानची अक्षय खन्नासाठी ऑस्करची मागणी
फराह खाननं 'धुरंधर'मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाचं कौतुक केलंय आणि त्याला ऑस्कर देण्याची मागणी केली आहे. फराह खाननं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अक्षय खन्ना एका बाजूला 'रहमान डकैत'च्या भूमिकेत दिसतोय, त्याच्याच खाली अक्षय खन्नाचा आणखी एक जुन्या सिनेमातला फोटो आहे. अक्षय खन्नाचा तो फोटो फराह खानच्या 'तीस मार खान' सिनेमातला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना फराह खाननं लिहिलंय की, "अक्षय खन्ना, तू खरोखरंच ऑस्करला पात्र आहेस..."
"...ते डोळ्यांनी भूमिका साकारतात, डोळ्यांतले भाव अस्वस्थ करतात"
अक्षय खन्नाच्या अभिनयाचं सोशल मीडियावरही कौतुक होत आहे. त्याच्या डोळ्यांतले भाव अस्वस्थ करतात आणि हत्येचा जो सीन अक्षयनं केलाय, तो भयभीत करतो. अक्षय खन्नानं साकारलेला 'रहमान डकैत' पडद्यावर दहशत निर्माण करतो. अक्षय खन्नाची भूमिका सर्वांना खूप आवडलीय. एरव्ही सिनेमांमध्ये हलक्याफुलक्या, लव्हर बॉय भूमिकांमध्ये दिसलेला अक्षय खन्नानं आपली चौकट मोडून आता खुंखार विलन साकारला आणि प्रेक्षकांना तो आवडला. 'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नानं त्याची एक नवी बाजू दाखवली आहे. म्हणूनच सोशल मीडियावर त्याचं कौतुक होतंय.
'अॅनिमल' मधील 'जमाल कुडू'शी तुलना
'धुरंधर' सिनेमातील त्याच्या व्यक्तिरेखेला उजाळा देण्यासाठी, एक अरबी गाणं चित्रित करण्यात आलं आहे, ज्यामध्ये खुंखार 'रहमान डकैत' अचानक थिरकायला लागतो. या गाण्याची तुलना 'अॅनिमल' मधील 'जमाल कुडू' शी केली जात आहे. दोन्ही गाणी खलनायकाची एन्ट्री शानदार बनवतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :