Akshay Kumar on Pranit More : 'बिग बॉस 19'चा चालू सीझन प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने खास ठरत आहे. सध्या सुरु असलेल्या सिझनमध्ये लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन आणि ‘महाराष्ट्रीयन भाऊ’ म्हणून ओळखला जाणारा प्रणित मोरे सहभागी झाला आहे. पहिल्या दिवसापासूनच प्रणितने आपल्या विनोदी शैलीने ‘बिग बॉस’च्या घरात आपली वेगळी छाप सोडायला सुरुवात केली आहे. त्याच्या कॉमेडीमुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण जणू हास्यकल्लोळात बदललं आहे. अलीकडेच ‘बिग बॉस 19’च्या तिसऱ्या आठवड्याचा ‘वीकेंड का वार’ पार पडला. यावेळी सूत्रसंचालन सलमान खानऐवजी बॉलिवूडचे सुपरस्टार अक्षय कुमार, अरशद वारसी आणि फराह खान यांनी केले. शोमध्ये स्पर्धकांशी गप्पा मारताना अक्षय कुमारने प्रणित मोरेशी खास मराठीत संवाद साधला आणि त्याच्या कामगिरीचं कौतुकही केलं. ‘बिग बॉस’च्या घरात बहुतांश स्पर्धक हिंदी भाषिक असतानाही अक्षयने प्रणितला मराठी भाषेत संबोधित करणं विशेष ठरलं.
एका टास्कदरम्यान स्पर्धकांना उभं करण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी ज्याच्यावर आरोप होते त्याच्या समोर तुरुंगाच्या गजांसारखा दांडा बसवला जात होता. हा दांडा लावण्याची जबाबदारी अक्षयने प्रणितला दिली. तो हसत म्हणाला, "प्रणित, हा दांडा लावायचं काम तुझंच आहे भाऊ… ओ भाऊ, मला खूप आवडतं तुझं दांडा लावणं. मी सगळं बारकाईने बघतो," अशा शब्दांत अक्षय कुमारने प्रणितला संबोधलं.
एका टास्कदरम्यान अक्षय कुमार प्राणितला मराठीत बोलताना म्हणाला, "हाय प्राणित, कसं चाललंय? सलमानने तुझ्या त्याच्यावर केलेल्या सर्व रोस्टिंग रील्स पाहिल्या आहेत आणि आता मीही माझ्यावर केलेले व्हिडिओ पाहिले आहेत. त्यामुळे एवढंच सांगायचंय की शोमधून बाहेर पडल्यावर आम्ही सगळे फिल्म सिटीच्या गेटबाहेर तुझी वाट पाहतोय." यानंतर अक्षयने स्पष्ट केले की तो फक्त मजेत बोलत आहे. पुढे प्राणितच्या कामाचे कौतुक करत तो म्हणाला, "काळजी करू नकोस, आमच्यावर रोस्टिंग आणि स्टँड-अप कॉमेडी व्हिडिओ करत राहा. लोकांना हसवणं ही चांगली गोष्ट आहे."
या भागात शोमधून पहिल्यांदाच दोन स्पर्धक बाहेर पडले. नतालिया आणि नग्मा मिराजकरला एलिमिनेट करण्यात आले. नग्माचे नाव घोषित होताच आवेझ भावुक झाला आणि म्हणाला की, "सोशल मीडियाबद्दल आणि कंटेंट क्रिएशनबद्दल मला सर्वात आधी नग्मानेच शिकवलं होतं. मला याचा काही अनुभव नव्हता कारण मी फक्त डान्सिंगवर लक्ष केंद्रित केलं होतं." शो सोडताना नग्माने आवेझच्या गालावर किस करत सांगितले की, "मी बाहेर जात आहे आपल्या लग्नाची तयारी करण्यासाठी." फराह खान आणि अक्षय कुमारसोबतच ‘जॉली एलएलबी 3’ चित्रपटातील कलाकार अरशद वारसी आणि सौरभ शुक्लाही बिग बॉसच्या वीकेंड वॉरमध्ये सहभागी झाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या