Patanjali: पतंजलीचा दावा आहे की आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत लोक रसायनांनी भरलेल्या औषधांपासून त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच पतंजली आयुर्वेदाच्या नैसर्गिक चिकित्सा पद्धती झपाट्याने लोकप्रिय होत आहेत. बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि आचार्य बालकृष्ण (Aacharya Balkrishna) यांनी स्थापन केलेल्या पतंजलीने प्राचीन भारतीय ज्ञान आधुनिक पद्धतीने लोकांसमोर आणले आहे. पंचकर्म, शत्कर्म आणि योगासारख्या थेरपीज शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करतात, तसेच मनालाही शांती देतात. या उपचारांना साईड इफेक्ट नसतात आणि लोकांच्या जीवनशैलीत बदल घडवून आणत आहेत, असा कंपनीचा दावा आहे.
शुद्ध उत्पादने आणि पारदर्शकता
कंपनीने स्पष्ट केले की, पतंजलीच्या यशामागे प्रमुख कारण आहे त्यांची पारदर्शकता आणि शुद्ध नैसर्गिक सामग्री. पतंजली शेतकऱ्यांकडून थेट औषधी वनस्पती आणि तेल खरेदी करते, त्यामुळे उत्पादनं शुद्ध राहतात. हर्बल टी, दंतकांती टूथपेस्ट आणि अॅलोवेरा जेलसारख्या उत्पादनांमुळे लाखो लोकांना फायदा झाला आहे. एका सर्वेनुसार लोक आता केमिकलयुक्त औषधांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण पतंजलीची उत्पादने स्वस्त, सुरक्षित आणि प्रभावी आहेत.
वेलनेस सेंटरला रोज हजारो रुग्ण
पतंजलीच्या माहितीनुसार, पंचकर्म थेरपी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, तर योग आणि ध्यान तणाव कमी करतात. हरिद्वारमधील पतंजली वेलनेस सेंटरला दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. येथे नेचरोपॅथी, हायड्रोथेरपी आणि मड थेरपीसारख्या पद्धती वापरल्या जातात.
आधुनिक चाचण्यांसोबत आयुर्वेद
पतंजलीचा रिसर्च फाउंडेशन आयुर्वेदाला आधुनिक वैज्ञानिक चाचण्यांशी जोडत आहे. कंपनीचा दावा आहे की अलीकडेच त्यांच्या कार्डियोग्रिट गोल्ड या औषधाने केमोथेरपीचे दुष्परिणाम कमी करण्यात यश मिळवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांवर आधारित हे उपचार आता जागतिक स्तरावर चर्चेत आहेत. विशेषतः मिलेनियल्स आणि जेन-झेड पिढी हेल्दी लाइफस्टाइलसाठी पतंजलीकडे वळत आहे. तसेच, कंपनीच्या फार्मर समृद्धी प्रोग्रॅममुळे शेतकऱ्यांना ऑर्गेनिक शेतीचे प्रशिक्षण मिळत आहे.
पतंजलीने गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे सांगितले जाते. रुग्णांच्या अनुभवांनुसार, या थेरपींमुळे डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या दीर्घकालीन आजारांवरही आराम मिळत आहे. पतंजलीच्या चिकित्सालयांमध्ये फ्री कन्सल्टेशन दिले जाते, त्यामुळे लोक सहज सल्ला घेऊ शकतात.
आरोग्यक्रांतीकडे वाटचाल
कंपनीच्या मते, पतंजलीच्या नैसर्गिक चिकित्सा पद्धती आरोग्याला सर्वांगीण दृष्टिकोनातून पाहतात- शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधतात. भारतासह जगभरात लोक निसर्गाकडे वळत आहेत आणि त्याच वेळी पतंजलीवरील विश्वासही वाढत आहे. कंपनीचा दावा आहे की ही चळवळ आरोग्याच्या नव्या क्रांतीकडे घेऊन जात आहे.