Kiku Sharda Breaks Down In Tears : अशनीर ग्रोव्हरचा रिअॅलिटी शो ‘राईज अ‍ॅण्ड फॉल’ सुरू होताच लोकप्रिय ठरला आहे. या शोमध्ये स्पर्धकांचा उत्साह आणि मस्ती प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मात्र अलीकडील एका भागाने हा आनंदाचा माहोल अचानक बदलून टाकला. कुस्तीपटू संगीता फोगाट यांच्या सासऱ्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला. त्याच वेळी कॉमेडियन कीकू शारदा (Kiku Sharda) देखील त्यांच्या दिवंगत आई-वडिलांच्या आठवणींत भावूक झालेला पाहायला मिळाला.

Continues below advertisement

दिवंगत आई-वडिलांबाबतच्या भावनांना वाट करुन दिली

कीकू शारदाला सर्वांनी नेहमी हसवणारा, आनंद देणारा कलाकार म्हणून पाहिलं आहे. त्यांची कॉमिक टायमिंग अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहे. ‘राईज अ‍ॅण्ड फॉल’मध्येही त्यांनी तोच अंदाज कायम ठेवला होता. पण ज्या क्षणी संगीता फोगाटला सासऱ्यांच्या निधनाची बातमी मिळाली, त्या वेळी कीकू शारदाही स्वतःला भावनिक होण्यापासून थांबवू शकले नाहीत. त्यांनी तो क्षण आठवला जेव्हा तो आईचा शेवटचा फोन उचलू शकला नाही आणि आईला बोलू शकला नाही.

कीकू शारदा रडताना म्हणाले, "मी दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत होतो आणि त्याच वेळी माझ्या आईचं निधन झालं. ही गोष्ट स्वीकारायला थोडा वेळ लागतो. तुम्ही एअरपोर्टवर आहात, तुम्ही अभिनेता आहात आणि त्या वेळी लोक तुमच्याकडे फोटो मागायला येतात. मी माझ्या आईचा शेवटचा फोन कॉल रिसीव्ह केला नव्हता."

आईचा शेवटचा फोन कॉल का उचलला नाही?

कीकू शारदाने पुढे कारण स्पष्ट करताना सांगितलं, "मी अमेरिकेत कामात व्यस्त होतो. मी विचार केला की उद्या फोन करीन कारण त्या वेळी मी खूप बिझी होतो. पण दुसऱ्याच दिवशी त्या या जगातून निघून गेल्या. त्यांच्या जाण्यानंतर अवघ्या 45 दिवसांत माझ्या वडिलांचंही निधन झालं. आईच्या जाण्याचं दुःख ते सहन करू शकले नाहीत."

"एक विशिष्ट वयानंतर तुमचा जोडीदार तुमच्यासाठी सर्वस्व बनतो. मला प्रत्येकाच्या आयुष्याबद्दल माहिती नाही, पण कृपया आपल्या जवळच्या लोकांशी नातं जपा, त्यांच्यासोबत वेळ घालवा, त्यांना फोन करा आणि सतत संपर्कात राहा," असं सांगताना कीकूच्या शब्दांनी तिथे उपस्थित असलेल्या सर्व स्पर्धकांच्या डोळ्यांत पाणी आलं.

‘राईज अ‍ॅण्ड फॉल’मध्ये कीकू शारदासोबतच पवन सिंह, अर्जुन बिजलानी, अहाना कुमरा, कुब्रा सैत, आदित्य नारायण आणि धनश्री वर्मा यांसारखे लोकप्रिय स्पर्धकही सहभागी आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Blockbuster Horror Comedy Su From So: 'कांतारा'च्या तोडीस तोड 'ही' फिल्म, बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता OTT वर करतोय ट्रेंड, 8.5 रेटिंग

Marathi Director On LGBTQ Community: 'लैंगिकता हा प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा खासगी भाग, ओळख नाही...'; मराठमोळ्या दिग्दर्शकानं मांडलं रोखठोक मत