Akshay Khanna: सध्या 'धुरंधर' (Dhurandar) हा सिनेमा अनेक चित्रपटगृहात धुमाकूळ घालतोय.. या चित्रपटातील प्रत्येक कलाकारांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. यासोबतच या चित्रपटातील एक अभिनेता आहे, ज्याला सर्वात जास्त लोकप्रियता मिळतेय. तो अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना..(Akshay Khanna) "छावा" नंतर, धुरंधर चित्रपटातील त्याच्या खलनायकाच्या भूमिकेची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. त्याच्या अभिनयासाठी अनेक चाहते त्याचं कौतुकही करत आहेत. विनोद खन्ना यांचा मुलगा, अक्षय खन्ना, आज त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो, परंतु एक काळ असा होता जेव्हा तो त्याच्या लहान वयातच टक्कल पडल्यामुळे त्याच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल खूप निराश आणि चिंतेत होता. याबद्दल अक्षय खन्ना याने स्वत:च एका जुन्या मुलाखतीतून सांगितलं आहे. ती मुलाखत सध्या खूप व्हायरल होतेयं.

Continues below advertisement

म्हणून लहान वयातच अक्षय खन्ना निराश झाला...(When Akshay Khanna Went Bald)

एका जुन्या मुलाखतीत, अक्षय खन्नाने खुलासा केला की त्याचे केस 19-20 व्या वयातच वेगाने गळू लागले. एका वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत बोलताना त्याने सांगितले की, हे अगदी लहान वयात सुरू झाले. "जेव्हा हे घडायला सुरूवात झाली, तेव्हा सर्वच गमावल्यासारखे वाटले. जोपर्यंत तुम्ही ते स्वीकारत नाही तोपर्यंत ते तुम्हाला ती गोष्ट सतत त्रास देत राहते. त्याने पुढे म्हटले, "जेव्हा तुम्ही सकाळी उठता आणि लक्षात येते की गोष्टी पूर्वीसारख्या नाहीत, तेव्हा ते तुम्हाला खोलवर हादरवून टाकते." 

"19-20 व्या वयात असे काहीतरी अनुभवणे अत्यंत हृदयद्रावक" - अक्षय खन्ना

एका चित्रपट नायकासाठी, केवळ त्याचे अभिनय कौशल्यच नाही तर त्याचे स्वरूप आणि व्यक्तिमत्व देखील महत्त्वाचे असते. पण कल्पना करा की एखाद्या अभिनेत्याची कारकीर्द नुकतीच सुरू झाली आहे आणि तरीही त्याचे केस गळत आहेत. अक्षय खन्नाने स्पष्ट केले की, त्याचे केस गळल्याने त्याला मानसिक त्रास सहन करावा होता. अक्षय म्हणाला, "एका अभिनेत्यासाठी, दिसणे खूप महत्वाचे आहे, विशेषतः चेहरा. ​​19-20 व्या वयात असे काहीतरी अनुभवणे अत्यंत हृदयद्रावक आहे"

Continues below advertisement

टक्कल पडल्याने मलाही तेच दुःख - अक्षय खन्ना

अक्षय खन्नाने मुलाखतीत त्याला टक्कल पडत असल्याचा त्रास सुरू झाला, त्या गोष्टीची तुलना एका खेळाडूच्या दुःखाशी केली आणि म्हटले, "जसे एखाद्या क्रिकेटपटूला अचानक कळते की त्याला गुडघ्याच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे आणि त्याच्या कारकिर्दीची दोन वर्षे वाया घालवणार आहे, त्याचप्रमाणे टक्कल पडल्याने मलाही तेच दुःख झाले."

महत्त्वाच्या इतर बातम्या :