Ajay Purkar On Chhatrapati Shivaji Maharaj: दिग्पाल लांजेकर (Director Digpal Lanjekar) दिग्दर्शित 'श्री शिवराज अष्टक' ही मालिका आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील पाचही चित्रपट ऐतिहासिक भव्यता, मांडणी आणि अभिनयामुळे गाजले. आता या मालिकेतील सहावा चित्रपट रणपति शिवराय स्वारी आग्रा' 30 जावेलारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पण, या सिनेमात चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) नाहीतर, मराठी अभिनेता (Marathi Actor) अभिजीत श्वेतचंद्र (Abhijeet Shwetachandra) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमिकेत दिसणार आहे. पण, गेल्या काही काळापासून या सिनेमांवर, सिनेमांच्या मालिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. तसेच, अनेकांनी आक्षेपही घेतलाय. अशातच आता या सिनेमाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात अजय पुरकर (Ajay purkar) यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. आम्ही अजूनही सगळे मानतो की, रायगडावर न्याय होतो बरं का, असं कार्यक्रमात बोलताना अजय पूरकर म्हणाले आहेत.
मराठी अभिनेते अजय पुरकर नेमकं काय म्हणाले?
मराठी अभिनेते अजय पुरकर म्हणाले की, "जय शिवराय सर्वांना. शिवराज अष्टक. मी काय दिग्पाल काय, आम्ही कायम म्हणतो की, आता शिवराज अष्टक आमचं राहिलेलं नाहीये. ते संपूर्ण महाराष्ट्राचं झालेलं आहे. सगळ्या माध्यम कर्मींचेही खूप धन्यवाद. 'शिवराज अष्टक' हे मी म्हटलं तसं महाराष्ट्राचं झालेलं आहे. किंबहुना ते भारताच्या बाहेरही गेलेलं आहे. आम्हाला अनेक मेसेजेस आणि फोन्स येत असतात. ते आम्हाला विचारतात, शिवराज अष्टकातली पुढची मोहीम काय असेल? पुढचा चित्रपट काय असेल? आणि अनेकांनी आम्हाला मुद्दाम सांगितलेलं की, तुमच्या टीमकडून स्वारी आग्रा हे बघायचंच आहे. त्यामुळे, हा मुद्दा उपस्थित झालेला की, मधल्या काही काळानंतर कोण आता महाराज साकारणार? त्याचं उत्तर आज तुम्हाला मिळालेलं आहे..."
पुढे बोलताना अजय पुरकर म्हणाले की, "पण, आम्ही अजूनही सगळे मानतो की, रायगडावर न्याय होतो बरं का! अनेक लोक आहेत, जे समाजासाठी काम करू इच्छितात, चांगलं काम करू इच्छितात, त्यांच्या वाटेत काटे पसरवणारे अनेक लोक असतात, ते सगळ्यांच्याच नशिबी असतात. चांगलं काम करणाऱ्या टीमच्या नशिबी तर असतातच असतात. तर, त्या सगळ्यांना हे उत्तर आहे की, महाराज हे आजही आहेत, पुढेही राहणारच आहेत. त्यामुळे अजूनही रायगडावर न्याय होतो, कोणीही या गैरसमजात राहू नये की, हे काम बंद पडू शकतं, असं काही होत नाही. आम्ही खंबीरपणे इथे उभे आहोत. आणि करायचे प्रयत्न तर अजूनही करा, आज तुमच्या माध्यमातून सांगतोय. फक्त नावं घेत नाहीये..."
अजय पूरकर कोण?
मराठी अभिनेते अजय पुरकर म्हणजे, मनोरंजन विश्वातलं गाजलेलं नाव. आजवर त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'असंभव', 'तू तिथे मी', 'राजा शिवछत्रपति' या प्रसिद्ध मराठी मालिकांमधून त्यांनी आपला ठसा उमटवला. या सोबतच प्रेमाची गोष्ट (2013), संघर्ष (2014) आणि मुंबई टाइम्स (2016) यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पावनखिंड' या चित्रपटात त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारलेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :